प्रशांत पवार म्हणाले, महाजेनको व ‘खनिकर्म’च्या अधिकाऱ्यांची वैयक्तिक चौकशी करा...

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) चौकशीचा अहवाल तयार केला असल्याने अनेकांचे धाबे दणाणले असल्याचे समजते. कराराप्रमाणे कोल वॉशरी कोळशाचा पुरवठा करीत नसल्याचा ठपका महाजेनकोने ठेवला आहे.
Prashant Pawar, Nagpur
Prashant Pawar, NagpurSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : कोल वॉशरी म्हणजे भ्रष्टाचाराचे अड्डे बनले आहेत. खाणींतून येथे कोळसा आणून डम्प केला जातो आणि तसाच विद्युत प्रकल्पांना पुरवला जातो. वॉश केलेला कोळसा रिजेक्टेड म्हणून खुल्या बाजारात विकला जातो. या प्रकारातून प्रकल्पांतील संच बंद पडण्यासारखे प्रकार घडतात. याविरोधात जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार (Prashant Pawar) यांनी सातत्याने आवाज उठवला आहे.

पवार यांच्या पाठपुराव्यामुळे महाजेनकोने खनिकर्म महाविकास मंडळाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सोबतच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) चौकशीचा अहवाल तयार केला असल्याने अनेकांचे धाबे दणाणले असल्याचे समजते. कराराप्रमाणे कोल वॉशरी कोळशाचा पुरवठा करीत नसल्याचा ठपका महाजेनकोने ठेवला आहे. महाजेनकोने वॉश कोलसाठी खनिकर्म महाविकास मंडळाची नोडल एजंसी म्हणून नियुक्ती केली होती. मंडळाने ब्लॅक लिस्टेड कंपन्यांना कोल वॉशरीचे काम दिले होते. कोल वॉश करण्यासाठी ६५० रुपये प्रतिटन वॉशरीजला दिले जात होते. सोबतच १५ टक्के रिजेक्ट कोळसाही दिला जात होता. रिजेक्ट कोल तपासण्याची कुठलीही यंत्रणा नव्हती. याचा फायदा घेत रिजेक्ट कोळसा चढ्या भावाने बाजारात विकला जात होता. हा कोट्यवधींचा गैरव्यवहार (Scams) राजरोसपणे सुमारे दोन वर्षांपासून सुरू होता.

जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार सतत या विरोधात आवाज उठवत होते. माहिती अधिकार कायद्यांतर्गत गैरव्यवहाराचे अनेक कागदपत्रे त्यांच्या हाती लागले होते. सर्व दस्तावेज त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तसेच सीबीआयला सोपवून चौकशीची मागणी केली होती. मात्र महाजेनको आणि खनिकर्म महामंडळ दखल घेत नव्हते. असे असले तरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत या प्रकरणाची गोपनीय पद्धतीने चौकशी सुरू होती. याची चाहूल लागताच महाजेनकोच्या अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. या माध्यमातून ते स्वतःला सुरक्षित करण्याचा खटाटोप करीत असल्याचे दिसून येते.

Prashant Pawar, Nagpur
प्रशांत पवार म्हणाले, प्रवीण दटके म्हणजे भाजपचा शेर आमदार…

कोल वॉशरीजच्या घोटाळ्याकडे जय जवान जय किसान संघटना सातत्याने लक्ष वेधत आहे. त्याचे सबळ पुरावेही दिले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी केली असेल तर त्याचा आम्हाला आनंदच आहे. आता महाजेनको आणि खनिकर्म विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांची वैयक्तिक चौकशी करावी. आजवर झालेल्या महाजेनकोच्या नुकसानीची त्यांच्याकडून भरपाई करण्यात यावी. तसेच ताबडतोब कोल वॉशरीजचा करार रद्द करण्यात यावा.

- प्रशांत पवार, अध्यक्ष,

जय जवान जय किसान संघटना

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com