Shiv Sena : मालमत्ता कराच्या मुद्द्यावरून अकोला येथे शिवसेना पुन्हा आक्रमक

Akola Corporation : कार्यालयाला ठोकले कुलूप; खुर्च्यांची तोडफोड. स्वाती कंपनीला दिलेले कंत्राट तातडीने रद्द करण्याची केली मागणी. नागरिकांना भुर्दंड बसत असल्याने राजेश मिश्रा यांचा संताप
Protest Against Swati Company in Akola.
Protest Against Swati Company in Akola.Sarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena : शिवसेना उद्धव ठाकरे गट पुन्हा एकदा अकोल्यात मालमत्ता कराचा विषय घेऊन आक्रमक झाला आहे. मालमत्ता करवसुली करणारी स्वाती इंडस्ट्रीज कंपनी नागरिकांना वेठीस धरत असल्याचा आरोप करीत थकीत करावरील व्याज रद्द करावा, तसेच स्वाती इंडस्ट्रीजला दिलेला वसुलीचा ठेका रद्द करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटातील अकोला पश्चिम शहर (Akola West) प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात महापालिका कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. या वेळी मालमत्ता कर व जलप्रदाय विभागाला कुलूप ठोकण्यात आले. जलप्रदाय विभागातील खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. शिवसेनेच्या या आंदोलनामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट मालमत्ता कराचा विषय घेऊन आक्रमक झाला आहे. अकोला शहरातील विविध मुद्द्यांवरून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सेनेकडून केला जात आहे. थकीत करावरील व्याज रद्द करावे तसेच स्वाती इंडस्ट्रीजला दिलेला वसुली ठेका रद्द करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. या मागण्यांसाठी शिवसेनेकडून शहरात विविध ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन करण्यात येत आहे. याच मुद्द्यावरून पुन्हा शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Protest Against Swati Company in Akola.
Swati Industries : अकोलेकरांच्या डोक्यावर 'स्वाती' चे भुत, आयुक्त व प्रशासक कविता द्विवेदींची मात्र बदली

अकोला महापालिका (Akola Municipal Corporation) कर विभागाच्या कार्यालयामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला. सोमवारी (ता. 25) शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक होत महापालिकेतील कर विभागाच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. एवढ्यावरच शिवसैनिक थांबले नाहीत, तर त्यांनी जलप्रदाय कार्यालयातील अधिकाऱ्यांची खुर्ची बाहेर आणून तोडली. महापालिकेकडून मालमत्ता कर, पाणीपट्टी आदी विविध प्रकारची वसुली केली जाते. तुलनेने अकोला शहरात कोणतीही विकासकामे महापालिका निधीतून होताना दिसत नाहीत. मालमत्ता कराची वसुली करणाऱ्या कंपनीला एकूण वसुलीवर 8.49 टक्के कमिशन दिले जाणार आहे. दुसरीकडे कराचा भरणा विलंबाने केल्यास नागरिकांकडून दरमहा 2 टक्के, तर वर्षाला 24 टक्के व्याज आकारले जात आहे.

शहरातील नागरिकांकडून करवसुलीचा ठेका चुकीच्या पद्धतीने स्वाती कंपनीला देण्यात आल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. स्वाती कंपनी शहरातील रहिवासी नागरिकांना घर जप्तीची धमकी देत आहे. त्यांना मनपाकडून अभय मिळत आहे. स्वाती कंपनीची ही दादागिरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष खपवून घेणार नाही, असा इशारा ठाकरे गटाकडून देण्यात आला. स्वाती कंपनीला दिले जाणारे कमिशन थांबविण्यात यावे. नागरिकांना शास्ती माफ करून मनपाने स्वतः करवसुली करावी, या मागणीसाठी मनपा उपायुक्त (Deputy Commissioner) यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन करण्यात आले. या वेळी जलप्रदाय विभागाचे अधिकारी केवळ खुर्च्या झिजवत असल्याचा निषेध म्हणून या विभागातून खुर्च्या बाहेर आणून तोडण्यात आल्या. महानगर अध्यक्ष राजेश मिश्रा यांचे नेतृत्वात ठिय्या आंदोलन करण्यात आले. याच वेळी जलप्रदाय विभागाचे अधिकारी नागरिकांच्या सेवेकडे दुर्लक्ष करतात म्हणून त्यांची खुर्चीही तोडण्यात आली.

Edited By : Prasannaa Jakate

R

Protest Against Swati Company in Akola.
Akola Municipal Corporation : खरोखर होणार का नव्या इमारतीचे स्वप्न साकार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com