Pusad APMC Election : पुसदच्या इतिहासात प्रथमच ‘या’ आमदारांनी दिले मनोहर नाईकांना आव्हान!

Pusad Bazar Samiti Election: दोघेही चुलत भाऊ विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच आमने-सामने आले आहेत.
Manoharrao Naik and Nilay Naik
Manoharrao Naik and Nilay NaikSarkarnama
Published on
Updated on

Yavatmal District APMC Election : महाराष्ट्राचे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनोहरराव नाईक यांच्या सहकार क्षेत्रातील वर्चस्वाला तडा देण्यासाठी त्यांचे पुतणे भाजपचे आमदार निलय नाईक यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत प्रथमच आव्हान उभे केले आहे. आज (ता. २८) या निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. (For the first time, a challenge has been raised in the elections)

पुसद तालुक्यात मनोहरराव नाईक यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत शेतकरी सहकार पॅनल व आमदार निलय नाईक यांच्या भाजप शिवसेना प्रणीत शेतकरी विकास पॅनलमध्ये चुरशीची लढत दिसत आहे. दुपारी एक वाजेपर्यंत पुसद, चोंढी, खंडाळा, जांब बाजार, गौळ, शेंबाळपिंपरी या केंद्रांवर जवळपास ६० ते ७० टक्के मतदान झाले. चोंढी येथे फेरफटका मारला असता दुपारी एक वाजेपर्यंत सहकारी संस्था व ग्रामपंचायत गटातील मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला.

नंतर नंतर मात्र हा वेग मंदावला. काही मतदार 'लंच ब्रेक'ची वाट पाहत असल्याचे सांगण्यात आले. पुसद येथील मतदान केंद्रांवर चांगली चुरस पहावयास मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इंद्रनील नाईक व भाजपचे आमदार निलय नाईक दोघेही चुलत भाऊ विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच आमने-सामने आले आहेत. दोघांच्याही नेतृत्वात कार्यकर्ते मतदानावर लक्ष ठेवून आहेत.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी पुसद परिसरात सहकारी संस्थांची उभारणी केली. शेतकऱ्यांच्या दृष्टीने कृषी उत्पन्न बाजार समिती ही अतिशय महत्त्वाची संस्था आहे. सुरुवातीपासूनच सहकार क्षेत्रात नाईक घराण्याचे वर्चस्व आहे. माजी मंत्री मनोहरराव नाईक यांचा शब्द प्रमाण मानून सहकारी संस्थांतील संचालकांची वर्णी लागण्याची पुसद सहकार क्षेत्रातील परंपरा आहे. त्यामुळे या सहकारी संस्थांवर मनोहरराव नाईक यांचा दबदबा आहे.

Manoharrao Naik and Nilay Naik
Nagpur APMC Election : युती-आघाडीने बिघडविले प्रस्थापितांचे गणित, रामटेक, कुही, पारशिवनीत मतदान सुरू !

सुरुवातीपासूनच कृषी उत्पन्न बाजार समिती मनोहरराव नाईक यांच्या ताब्यात होती. त्यांनी सुचविलेली संचालक पदाची नावे अंतिम ठरत होती. यावेळी मात्र चित्र बदलले आहे. त्यांचे पुतणे भाजपचे निलय नाईक यांनी भाजप शिवसेनाप्रणीत स्वतंत्र पॅनल उभे केल्याने यावेळी नाईक विरुद्ध नाईक असा सामना रंगत आहे.

एकूण १८ संचालक पदांसाठी ४४ उमेदवार रिंगणात आहेत. सहकारी संस्था व ग्रामपंचायत गटातील मतदारांवर मनोहरराव नाईक यांचा प्रभाव असला तरी यावेळी काकांना काटशह देण्यासाठी पुतणे निलय यांनी चांगलाच जोर लावला आहे. त्यामुळे ही निवडणूक (APMC Election) एकतर्फी राहिलेली नसून विजयश्री खेचून आणण्यासाठी चढाओढ दिसून येत आहे. दुपारी चार वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून सायंकाळी सहा वाजता अग्रवाल मंगल कार्यालयात मतमोजणी होणार आहे.

Manoharrao Naik and Nilay Naik
Barshitakali APMC News: महाविकास असूनही सहकारमध्ये सोयीचा ‘असहकार’, 'फिल्डिंग' अखेरच्या टप्प्यात !

सायंकाळकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मते वळविण्यासाठी धनलक्ष्मीचे प्रयोग झाल्याचीही चर्चा आहे. काहींना रात्री बारा वाजता मिळालेली पाकिटे त्यांनी सकाळी परत केल्याचेही किस्से ऐकावयास मिळाले. पुसद (Pusad) शहरातही हे प्रकार घडल्याने बाजार समिती निवडणुकीतील (Election) नवा ट्रेंड निवडणुकीचा निकाल कुठे घेऊन जाणार, हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे निकालाची उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com