MLA Disqualification Case : कायद्याचे रक्षण करूनच नार्वेकरांचा निकाल

Chandrashekhar Bawankule : भाजप प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला ठाम विश्वास...
Chandrashekhar Bawankule, Eknath Shinde
Chandrashekhar Bawankule, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : विधानसभाध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर विधानमंडळाचे नियम-परंपरांचे पालन करतील. कायद्याचे रक्षण करून ते निकाल देतील, असा ठाम विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. शिंदे-नार्वेकरांची भेट ही नियमित प्रक्रिया आहे. त्याचा आमदारांच्या अपात्रता प्रकरणाच्या निकालाशी संबंध नाही, असे ते म्हणाले.

नागपूर येथे बुधवारी (ता. 10) त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमदार अपात्रतेसंदर्भात निकालाच्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर ते आपले मत व्यक्त करीत होते. उद्धव ठाकरे यांनी नार्वेकरांवर केलेल्या टीकेचा समाचार घेताना ते म्हणाले की, आपले गुन्हे, पाप आणि अपयश लपविण्यासाठी दुसऱ्याच्या माथी खापर फोडणे सर्वात सोपे असते. त्यामुळेच असा ‘नॅरिटिव्ह सेट’ केला जात आहे.

Chandrashekhar Bawankule, Eknath Shinde
MLA Disqualification Result: निकालाआधीच नार्वेकरांचं मोठं विधान; म्हणाले, 'निकालातून सर्वांना...'

वस्तूस्थितीसह नियम व कायद्याची परंपरा राखली पाहिजे. आरोप-प्रत्यारोप करून मनाला जरी समाधान मिळत असले, तरीदेखील जनतेला सर्वच ठाऊक आहे. अखेर सत्य हे सत्यच आहे. निकाल हा कायद्यानुसारच येणार आहे. त्यामुळे कुणीही मनात शंका बाळगण्याची गरज नाही, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. आमदार अपात्रतेचा निकाल आणि पक्षप्रवेशाचा काहीच संबंध नाही.

आमदार अपात्रतेचे प्रकरण एकीकडे आहे आणि भाजपाचे काम वेगळ्या पद्धतीने सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या गेल्या 10 वर्षांतील कामांचे संपूर्ण मूल्यमापन जनता करीत आहे. चीनसारखा विरोधी देशदेखील मोदींच्या कामाची प्रशंसा करीत आहे. जगाचा विश्वास मोदींवर आहे. कुणी काही म्हणाले, तरी काहीच फरक पडणार नाही, असेही ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या 16 आमदारांची सुनावणी सुरू आहे. नार्वेकर यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदारांना आपले म्हणणे सादर करण्यासाठी मुदत दिली होती. आमदारांनी तब्बल सहा हजार पानांचे लेखी उत्तर पाठविले होते. यात पुराव्यांचाही समावेश होता. ‘आम्हीच शिवसेना’ हे पटवून देण्याचा दोन्ही गटांकडून प्रयत्न करण्यात आला.

‘राहुल नार्वेकर उत्तम वकील आहेत. त्यांना कायद्याचे उत्तम ज्ञान आहे. त्यांना कायदा कळतो. ते योग्य व नियमानुसार निर्णय देतील. राहुल नार्वेकर चुकीचा निर्णय देऊ शकत नाहीत,’ अशी प्रतिक्रिया आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी यापूर्वीच दिली आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थिर होते आणि स्थिरच राहील, असे विधान केल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Edited by : Atul Mehere

R...

Chandrashekhar Bawankule, Eknath Shinde
#Shorts | बघा संजय गायकवाड यांनी देवाकडे काय मागितलं ? | Sanjay Gaikwad | 16 MLA Disqualification |

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com