Ramdas Athavale : राज ठाकरे चांगले ॲक्टर, पण मी असल्यामुळे ते भाजपसोबत येणार नाहीत !

राज ठाकरे कायम भूमिका बदलत असतात. मराठी माणसाने सर्वधर्मीयांबद्दल मानवतावादी भूमिका घ्यावी. मात्र राज ठाकरे वाद वाढवितात, असा आरोप राज ठाकरेंवर आठवलेंनी (Ramdas Athavale) केला.
Ramdas Athavale and Raj Thackeray
Ramdas Athavale and Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

नागपूर : पीएफआय या संघटनेवर केंद्र शासनाने बंदी घातली. या बंदीचे समर्थन करतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मात्र राष्ट्रवादाचे कार्य करीत असल्याची पावती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी येथे दिली.

दीक्षाभूमीवर ६६ व्या धम्मचक्रप्रवर्तन दिन कार्यक्रमासाठी नागपुरात (Nagpur) आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पीएफआय संघटना देश हिताची नसल्याचे सांगत संघ राष्ट्रवाद जपण्याचे कार्य करीत असल्याचे प्रमाणपत्र देऊन टाकले. मनसेचे नेते राज ठाकरे (Raj Thackeray) लोकप्रिय आहेत. त्यांच्या पक्षाच्या झेंड्यावर निळा व भगवा होते. अलीकडे तो झेंडा बदलला. तसे ते कायम भूमिका बदलत असतात. मराठी माणसाने सर्वधर्मीयांबद्दल मानवतावादी भूमिका घ्यावी. मात्र राज ठाकरे वाद वाढवितात, असा आरोप राज ठाकरेंवर आठवलेंनी केला.

राज ठाकरे उत्तर व दक्षिण भारतीयांचा विरोध करतात. मुस्लिमांचा द्वेष करतात. केवळ दोन मिनिटांच्या अजानसाठी भोंग्याचे राजकारण त्यांनी केले असे सांगत हे भोंग्याचे राजकारण बंद करावे. हिंदूंचे सण असोत की भीमजयंती वा गणपती, नवरात्री किंवा इतर उत्सव. सर्वांच्या उत्सवात भोंग्याचा वापर होतो. त्यामुळे यावरून विनाकारण वाद निर्माण करू नये, असे सांगत केंद्रातील मोदी सरकारच्या कामगिरीचे कौतुक आठवले यांनी केले. राज ठाकरेंना सोबत घेण्यास आठवले यांनी विरोध दर्शविला आहे. याबाबत विचारले असता, राज ठाकरे चांगले ॲक्टर आहेत. पण म्हणून त्यांना सोबत घेण्याची काही एक गरज नाही आणि मी असल्यामुळे ते भाजपसोबत येणारच नाहीत, असेही आठवले म्हणाले.

बेरोजगारीच्या प्रश्नावर नोकरी देणारे व्हावे, असे मत त्यांनी मांडले. महागाईच्या मुद्यावर मात्र आठवले यांनी सारवासारव केली. भाजपचे प्रवक्ता आहात काय, असा प्रश्न छेडला असता, त्यांनी एनडीएचा घटक व मोदी सरकारमध्ये मंत्री असल्याने भाजपबद्दल मत व्यक्त करण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. रिपाइंच्या एकत्रीकरणातून पक्षाची ताकद वाढेल. सत्ता मिळणार नाही. सत्तेसाठी इतर पक्षाची साथ घेता येईल, असे ते म्हणाले.

मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता येणार नाही, असे भाकीत करीत भाजप-रिपाइं युती २२७ वॉर्डांपैकी १५० जागांवर यश मिळेल, असा दावाही त्यांनी केला. काल रवीभाव येथे झालेल्या पत्रपरिषदेला भूपेश थुलकर, दयाल बहादुरे, बाळू घरडे, राजन वाघमारे, विनोद थुल, सतीश तांबे, डॉ. मनोज मेश्राम, महेंद्र मानकर आदी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. २०१९ मध्ये एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवायला हवे होते. तसे झाले असते तर बंड झाले नसते. मुंबईत दोन्ही शिवसेनांचा सामना रंगणार आहे. शिंदेकडे दोन तृतीयांश म्हणजेच ४० आमदार आणि १२ खासदार आहेत. यामुळे शिंदेंची शिवसेना खरी शिवसेना आहे, असेही रामदास आठवले म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com