Raj Thackeray News : राज ठाकरे यांनी लक्षात आणून दिले, हे चांगले झाले !

Maharashtra : अतिक्रमण तातडीने सरकारने काढले पाहिजे.
Raj Thackeray and Chandrashekhar Bawankule
Raj Thackeray and Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Chandrashekhar Bawankule on Raj Thackeray : राज ठाकेरेंनी काल जो आक्षेप घेतला आणि सरकारच्या लक्षात आणून दिलं, हे चांगलं झां. शेवटी सरकारमध्ये अनेक गोष्टी माहीत नसतात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने कारवाई करीत ते बांधकाम पाडले. असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. (The encroachment should be removed by the government immediately)

नागपुरात विमानतळावर पत्रकारांशी बोलताना आमदार बावनकुळे म्हणाले, यानंतर मात्र आणखी ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे, त्या ठिकाणी आणखी काही तक्रारी आल्यास तेथेही सरकारने तातडीने अशा अतिक्रमणावर कारवाई करावी. आज माहीममध्ये जे सुरू आहे आणि जिथे जिथे असे अतिक्रमण असेल ते अतिक्रमण तातडीने सरकारने काढले पाहिजे. याशिवाय समाजामध्ये कुठलेही वैर निर्माण होणार नाही याकरता सरकार काम करेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

राज ठाकरे आक्षेपार्ह काही बोलले, असे मला वाटत नाही. उलट त्यांनी जावेद अख्तर यांचा गौरव केला आहे. भारत देशात राहणारा प्रत्येक मुस्लिम हा आपलं संविधान मानतो, त्यामुळे या विषयात वाद निर्माण करण्याचं कारण नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहेत. याबद्दल विचारले असता, भोंग्याच्या आंदोलनातले ते गुन्हे असतील, असे ते म्हणाले.

मनसेने हे आंदोलन केले तेव्हा भोंगे काढले नाहीत, पण मनसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. अनेक मनसैनिकांवर तेव्हा गुन्हे दाखल झाले. सरकारने गुन्हे मागे घेतले पाहिजे, कारण त्यात कुठलेही नुकसान झालेलं नाही, असेही आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

Raj Thackeray and Chandrashekhar Bawankule
Bawankule : बावनकुळे विचारतात, `त्यासाठी` अजित पवार जबाबदार नाहीत का?

शरद पवारांच्या (Sharad Pawar) पुढाकाराने मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. याबाबत बोलताना आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, ज्या ठिकाणी ते जिंकतात, त्या ठिकाणी ईव्हीएममध्ये गडबड नसते. ज्या ठिकाणी ते हरतात, त्या ठिकाणी मात्र ईव्हीएममध्ये गडबड असते. नरेंद्र मोदी पुन्हा एकदा विजय होतील, हे त्यांना माहीत झालं आहे, त्यामुळे ईव्हीएम (EVM) खराब आहे असा बहाणा ते करतील. काहीतरी उत्तर द्यायला कारण पाहिजे म्हणून आतापासून ते तयारी करत आहेत.

काल गुढीपाडव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) सभा पार पडली. यानिमित्त लावण्यात आलेल्या एका बॅनरवर राज ठाकरे यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे. यासंदर्भात विचारले असता, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असावा, हे तेरा कोटी जनता ठरवेल. कोणी कोणाचे बॅनर लावले, याला अर्थ उरत नाही. २०२४मध्ये जनता जो निर्णय ,घेईल तो आम्ही मान्य करू आणि सर्वांनीच तो मान्य केला पाहिजे, असे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com