Raj Thackeray : राज ठाकरे म्हणाले, २०२४चा आमदार म्हणून मी राजूकडे बघतोय...

विदर्भाच्या यवतमाळ जिल्ह्यातील वणी हा विभाग राजूने एकदम जोरदार आणि व्यवस्थित बांधला आहे. तेथील जनतेची राजूला साथ आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
Raju Umbarkar and Raj Thackeray
Raju Umbarkar and Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) सर्वेसर्वा राज ठाकरे परवा परवा विदर्भाचा दौरा संपवून मुंबईला परतले. या दौऱ्यात त्यांनी विभागवार सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली. विदर्भाच्या (Vidarbha) यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना त्यांनी प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर (Raju Umbarkar) यांची तोंडभरून प्रशंसा केली.

वणीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, गत निवडणुकीत आपण का पडलो, याचा विचार करून आपण आता तयारीला लागले पाहिजे. निवडणुका येत असतात, अन् जात असतात. किंबहुना आपल्या देशात दुसरा धंदाच नाही उरला की काय असं वाटायला लागतंय. एक झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी, वर्षभर कुठे ना कुठे निवडणुका सुरूच असतात. त्याचं काही नवल नाही. पण येणारी निवडणूक आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. त्यासाठी आपण सर्वांनी आत्तापासूनच कामाला लागलं पाहिजे.

विदर्भाच्या यवतमाळ जिल्ह्यातील वणी हा विभाग राजूने एकदम जोरदार आणि व्यवस्थित बांधला आहे. तेथील जनतेची राजूला साथ आहे. त्यामुळे २०२४ चा आमदार म्हणून त्याच्याकडे बघतो आहे. पक्षासोबत तुम्ही राहिलात आणि अशीच साथ राजूला देत राहिलात, तर हा दिवस जास्त दूर नाही, असे ठाकरे म्हणाले. आता तुमच्या स्थानिक निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या सर्व लोकांनी एकदा मुंबईला या. नाहीतर मी पुन्हा विदर्भाच्या दौऱ्यावर येणारच आहे. तेव्हा वणीला नक्की येईन. त्यावेळी मला नक्की भेटा. आता प्रत्येकाशी वन-टू-बोलणे आणि फोटो काढणे शक्य नाही. त्यामुळे स्थिती समजून घ्या. कारण मी एकटाच आहे. १०-१२ कॉपी काढता आल्या असत्या तर नक्कीच आपण ते केले असते, अशी मिश्‍किल टिप्पणीही त्यांनी केली. यावेळी सभागृहात हंशा पिकला.

Raju Umbarkar and Raj Thackeray
उंबरकर यांनी घेतला रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना तयार करण्याचा संकल्प !

राज ठाकरेंनी पाठीवर कौतुकाची थाप मारल्यामुळे राजू उंबरकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे. आतापर्यंत झालेल्या प्रत्येक निवडणुकीत ते चौथ्या, तिसऱ्या स्थानावर राहात आले आहेत. त्यानंतरही त्यांनी आपले काम थांबविले नाही. कोरडा दुष्काळ असो की पूर परिस्थिती लोकांच्या मदतीला ते नेहमीच धावून जातात. नुकत्याच झालेल्या पूर परिस्थितीमध्ये त्यांनी लोकांच्या निवाऱ्याची, खाण्यापिण्याची व्यवस्था केली. येवढेच नव्हे तर त्यांच्या जनावरांच्या चाऱ्याचीही व्यवस्था त्यांनी केली. त्यांच्या या कामाचे कौतुक झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com