मुंबई : शिवसेनेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडून पुन्हा भाजप बरोबर घरोब करावा आणि अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद उध्दव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी वाटून घ्यावे असा फॉर्म्युलाही केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. इतकेच नव्हे तर, ऑक्टोबरमध्ये येणा्रया दसरा मेळाव्या आधी भाजपसोबत येण्याचा शिवसेनेने निर्णय घ्यावा असा मुहूर्तही सांगितला आहे.
राज्याचा विकास करण्यासाठी केंद्राकडून जास्तीत जास्त निधी मिळावा, यासाठी उध्दव ठाकरेंनी शिवसेना -भाजप युती पुन्हा एकदा घडवून आणावी असा आग्रह रामदास आठवले यांनी केला आहे. मुंबईत (ता.२१ सप्टेंबर) प्रसारमाध्यमांसोबत ते बोलत होते
तिन्ही पक्षांत धुसमूस सुरु असून सातत्याने एकमेकांवर आरोप केले जात असल्याने राज्याच्या विकासाच्या प्रश्नांवर परिणाम होत असल्याचे निरिक्षणही त्यांनी यावेळी नोंदवले. रोज एकमेकांवर गंभीर आरोप करुन परत एकत्र सत्तेत राहणे योग्य नाही. काँग्रेसने पाठिंबा काढावा किंवा शिवसेनेने भाजपासोबत यावे. अडीच वर्ष उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री राहावे आणि अडीच वर्ष फडणवीस यांना मुख्यंमंत्री करावे. तसेच, पुढील निवडणुका एकत्रित लढून महाराष्ट्राचं विकास करावा, असेही यावेळी त्यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांनी शरद पवारांवर इतका गंभीर आरोप केला आहे तर, शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहू नये. शिवसेनेने पुन्हा एकदा स्वगृही परतत भाजपा, आरपीआयसोबत मिळून बाळासाहेबांचे शिवशक्ती -भिमशक्ती स्वप्न साकार केले पाहिजे,” असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांंनी एका कार्यक्रमात बोलत असतांना काँग्रेस, राष्टवादी काँग्रेस पक्षावर टिका करत आमचे नेते फक्त बाळासाहेब ठाकरे असून त्या व्यतिरिक्त कोणीही होऊ शकत नसल्याचे म्हणत शरद पवारांवर टिका केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.