Ramtek APMC : रामटेकमध्ये पराभवानंतरही राहणार केदारांचेच वर्चस्व?

Sunil Kedar : हे पैसे केदार यांच्या मार्फतच त्यांना देण्यात आले होते.
Sunil Kedar
Sunil KedarSarkarnama

Nagpur District's Ramtek APMC Election News : सचिन किरपान यांच्या सहकार पॅनलने रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. ते केदार यांचे कट्‍टर समर्थक आहेत. स्वतंत्र पॅनल टाकून त्यांनी बाजार समिती जिंकली असली तरी ते पुन्हा केदारांकडे जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पराभव झाला असला तरी रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीवर केदार यांचेच वर्चस्व राहण्याची दाट शक्यता आहे. (It is very likely that he will go back to Kedar)

अवसायानात गेलेल्या सेवा सोसायट्यांना पुनर्जिवित करण्यासाठी त्यांनी पैसे भरले. हे पैसे केदार यांच्या मार्फतच त्यांना देण्यात आले होते. याचा फायदा किरपान यांनी घेऊन सोसायट्‍यांवर आपल्या सग्यासोयऱ्यांची नोंदणी केली. त्याबळावर त्यांनी रामटेक कृषी उत्पन्न बाजार समिती जिंकली.

दोन आमदारांचे पॅनल पराभूत, जयस्वालांना युती भोवली..

शिंदे गटाचे रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी मंत्री आणि सावनेरचे आमदार सुनील केदार यांच्यासोबत केलेली युती चांगलीच भोवली. दोन्ही आमदारांच्या उमेदवारांना त्यांच्याच कार्यकर्त्यांनी पराभूत करून चांगलाच धक्का दिला. सोबतच यापुढे अशी अभद्र युती खपवून घेतली जाणार नाही असाही इशारा स्थानिकांनी दिला आहे.

रामटेकमध्ये जयस्वाल यांचे चांगलेच वर्चस्व आहे. सर्वच पक्षांचे उमेदवार असताना त्यांनी स्वबळावर विधानसभेची निवडणूक जिंकली. शिवसेना सोडून शिंदे सेनेत गेल्यानंतर अनेक स्थानिक पदाधिकारी त्यांच्यासोबत गेले आहेत. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केदारांच्याही कार्यकर्त्यांचे या मतदारसंघात मोठे जाळे आहे.

Sunil Kedar
Yavatmal APMC Results : यवतमाळ जिल्ह्यात सत्ताधाऱ्यांचा उठला ‘बाजार’ !

केदारांसोबत वैर असलेले काँग्रेसचे कार्यकर्ते गजू यादव यांच्या समर्थकांना कुठल्याही परिस्थितीत बाजार समितीत येऊ द्यायचे नाही, याकरिता केदारांनी पुढाकार घेऊन जयस्वाल (Ashish Jaiswal) यांच्यासोबत हात मिळवणी केली. विधानसभेत यादव काँग्रेसचे उमेदवार होते. भविष्यात यादव यांनी उचल खाऊ नये, याकारिता जयस्वाल यांनीसुद्धा केदारांची ऑफर डोळे लाऊन स्वीकारली. दोन आमदार एकत्र आल्याने याचा मोठा फायदा होईल, असे चित्र निर्माण केले.

शिंदे-कॉंग्रेस समीकरण रुचले नाही..

दुसरीकडे शिंदे सेना (Eknath Shinde) आणि काँग्रेस (Cogress) एकत्र आल्याचे कार्यकर्त्यांना फारसे रुचले नाही. विशेष म्हणजे केदार (Sunil Kedar) यांचे कट्‍टर समर्थक समजले जाणारे सचिन किरपान यांनी संधीचा फायदा उचलला. सहकारी सोसायट्यांमध्ये स्वतःच्या मतदारांची संख्या अधिक असल्याचे बघून त्यांनी वेगळी चूल मांडली.

Sunil Kedar
Vijay Wadettiwar News: … तर या देशात लोकशाही फक्त नावालाच राहील, असं का म्हणाले वडेट्टीवार ?

केदारांनी तळ ठोकूनही फायदा नाही..

भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी गजू यादव यांच्या साथीने शेतकरी सहकारी पॅनलने सर्व जागा जिंकून दोन्ही नेत्यांना बाजार समितीच्या बाहेर ठेवले. विशेष म्हणजे गजू यादव यांचा भाऊ कुठल्याही परिस्थितीत निवडून येऊ नये, याकरिता केदार तीन दिवस तळ ठोकून बसले होते. मात्र त्याचाही काही फायदा झाला नाही.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com