Ramtek Lok Sabha Constituency : खासदार कृपाल तुमानेंवर का आहेत मतदार नाराज?

Narendra Modi : मोदी लाट कारणीभूत ठरली होती. 2014च्या निवडणुकीची प्रचिती आता 2024च्या लोकसभा निवडणुकीत येणार का?
Krupal Tumane
Krupal TumaneSarkarnama
Published on
Updated on

Ramtek Lok Sabha Constituency : रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी स्वत:च्या 'हिरा बालाजी' सूतगिरणीव्यतिरिक्त इतर कुठलाही प्रकल्प मतदारसंघात आणला नाही. विकासकामांचासुद्धा पत्ता नाही. रामटेक मतदारसंघात जवळपास 2000 हून अधिक गावे असून, गत 10 वर्षांच्या काळात यातील अनेक गावांना खासदारांचे पाय लागलेले नाहीत, अशी नाराजी मतदारांत आहे. त्यामुळेच या वेळी त्यांच्या उमेदवारीवर दहा वेळा विचार केला जात आहे. रामटेकचा कार्यकर्त्यांचा मेळावा बघितल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही ‘कॉन्फिडन्स लूज’ झालेला बघायला मिळाला.

काँग्रेसचे दिग्गज आणि अभ्यासू नेते मुकुल वासनिक यांनी यापूर्वी रामटेकचे प्रतिनिधित्व केलेले आहे. ते केंद्रीय मंत्रीसुद्धा राहिलेले आहेत. नागपूर-नागभीड ब्रॉडगेजसह रामटेक क्षेत्रातील अनेक प्रकल्प उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे, असे असतानासुद्धा दुसऱ्या टर्ममध्ये रामटेकने त्यांना नाकारले. वासनिक यांनी या मतदारसंघात भरपूर कामे केली. मात्र, हे सर्व करताना त्यांनी दिल्ली सोडली नाही. त्यामुळे मतदारसंघाशी आणि तेथील मतदारांशी त्यांची जुळलेली नाळ आपसूक तुटत गेली.

2014च्या लोकसभा निवडणुकीत कृपाल तुमाने यांच्यासारख्या अतिशय सामान्य आणि अपरिचित व्यक्तीकडून हेविवेट नेते मुकुल वासनिक यांच्यासारख्या नेत्याला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. याला मोदी लाट कारणीभूत ठरली होती. 2014च्या निवडणुकीची प्रचिती आता 2024च्या लोकसभा निवडणुकीत येणार का? आणि ही एकप्रकारे मतदारांनी घेतलेली 'गॅरंटी' आहे का, असे प्रश्‍न उपस्थित झाले आहे, कारण मागील दहा वर्षांत तुमाने यांचेसुद्धा उपराजधानी असलेल्या संत्रानगरीतील 'हाय प्रोफाइल' कार्यक्रमाव्यतिरिक्त रामेटककरांना त्यांचे दर्शन झाले नाही?

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Krupal Tumane
Krupal Tumane News : मुख्यमंत्री शिंदेंचे बोट धरलेल्या खासदार कृपाल तुमानेंना भाजप स्वीकारणार का ?

रामटेक 'हॅटट्रिक'ची संधी देत नाही...

देशाचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव, ए. जी. सोनार, जतिराम बर्वे, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते या सर्वांनी रामटेकचे दोन टर्म प्रतिनिधित्व केले आहे. यातील काहींना तिसरी टर्म लढता आली नाही किंवा ज्यांनी लढण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या पदरात केवळ दारुण पराभव आला आहे. एकंदरीत रामटेकचा इतिहास बघितल्यास रामटेकने कुणालाही 'हॅटट्रिक'ची संधी दिलेली नाही, हे विशेष.

काय म्हणतात भाजप जिल्हाध्यक्ष कोहळे ?

गेल्या महिन्यात पत्रकार परिषदेला संबोधित करताना भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुधाकर कोहळे यांनी रामटेकची जागा ही कमळ चिन्हावर लढल्या जाईल, अशी आग्रही भूमिका मांडली होती. शिवाय त्यासाठी आमच्याकडे चांगले चेहरे असल्याचेही त्यांनी सांगितले. कोहळे यापूर्वी नागपूरचे आमदार राहिलेले असून, आमदार मोहन मतेंच्या 'एन्ट्री'मुळे त्यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली नाही. मध्यंतरी त्यांच्या बाबतीत काँग्रेस प्रवेशाच्या चर्चाही पसरल्या होत्या.? अशात भाजपने त्यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ घालत विश्वास व्यक्त केला. त्यामुळे या विश्वासाला सार्थ ठरविण्याची जबाबदारी आता कोहळेंवर आहे. त्यासाठी रामटेक लोकसभा निवडणुकीत त्यांची भूमिका, योगदान आणि मेहनत मोलाची ठरणार आहे.

...तर तिहेरी लढतीची शक्यता?

रामटेकचे प्रतिनिधित्व आतापर्यंत सेनेकडून होत असले तरी आता चित्र बदलले आहे. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप असा दुहेरी सामना होणार आहे. कदाचित महायुतीकडून कृपाल तुमाने यांना पुन्हा उमेदवारी मिळाल्यास, लढत तिहेरी होण्याची शक्यता आहे. कारण तुमाने यांच्या विरोधात लढायला, अनेक जण तयार असल्याचे खासगीत बोलत आहेत. इतर पक्षांतील काही चेहरे अपक्ष किंवा 'डमी' उमेदवार म्हणूनसुद्धा समोर येऊ शकतात.

Edited By : Atul Mehere

R

Krupal Tumane
Krupal Tumane यांचे गंभीर आरोप, Ajit Pawar चांगलेच भडकले | NCP | Shivsena | Sarkarnama Video

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com