Ramtek Lok Sabha Election : ...आणि म्हणून महायुतीने राजू पारवेंच्या हाती दिला धनुष्यबाण !

Krupal Tumane : मागील लोकसभा निवडणुकीत भाजप व शिवसेना सोबत होती. परंतु त्यानंतर राजकीय समीकरण बदलले. शिवसेनेचे दोन गट पडले. विद्यमान खासदार कृपाल तुमाने शिंदेंच्या शिवसेनेसोबत राहिले.
Raju Parve
Raju ParveSarkarnama
Published on
Updated on

Ramtek Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच इतर पक्षातील नेत्यांना आपल्याकडे ओढत विजयाचे लक्ष्य गाठण्याची गोळा-बेरीज सर्वच राजकीय पक्षांकडून होताना दिसत आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने (शिंदे गट) कॉंग्रेसचे आमदार राजू पारवे यांना उमेदवारी दिली आहे. कॉंग्रेसच्या परंपरागत मतदारांचा कौल मिळाल्याशिवाय विजय शक्य नसल्यानेच महायुतीने पारवेंच्या हाती धनुष्यबाण दिल्याची चर्चा आहे.

कॉंग्रेसचे प्रत्यक्षात किती मतदार आपल्याकडे खेचण्यात पारवेंना यश मिळते, यावर जय, पराजयाचे गणित ठरणार असल्याची चर्चा होत आहे. राजू पारवे उमरेड विधानसभा मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत विजय झाली होते. त्यांनी भाजपचे सुधीर पारवे यांचा पराभव केला होता. मागील लोकसभा निवडणुकीत भाजप व शिवसेनासोबत होती. परंतु त्यानंतर राजकीय समीकरण बदलले. शिवसेनेचे दोन गट पडले. विद्यमान खासदार कृपाल तुमाने शिंदेंच्या शिवसेनेसोबत राहिले.

यंदा उद्धव ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीचा घटक आहे, तर शिंदेंची शिवसेना महायुतीसोबत आहे. रामटेकची जागा मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत भाजपही आग्रही होते. कृपाल तुमाने यांच्या नावाला भाजपने विरोध दर्शवला होता. बदलत्या राजकीय परिस्थितीत ही जागा जिंकण्यासाठी कॉंग्रेसच्या मतदारांची गरज भासणार असल्याचा सूर पक्षातून निघाला. त्यातूनच उमरेडच्या आमदारांना पक्षात घेण्याची तयारी भाजपने केल्याची चर्चा आहे. परंतु जागेचा तिढा निकाली निघत नसल्याने त्यांचा पक्षप्रवेश अडकला होता. अखेर ही जागा शिंदेकडे आली. त्यामुळे भाजपने पारवेंना शिंदे सेनेत पाठवत धनुष्यबाण हातात देऊन मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Raju Parve
Ramtek Lok Sabha Election : शिवसेनेचे संघटनप्रमुखच करणार बंडखोरी; म्हणाले, ठाकरेंचा फोन आला तर...

पारवे उमरेड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होते. रामटेक लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यातील पाच विधानसभा मिळून महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांतील अंतर थोड्याफार प्रमाणात असेल. उमरेडवर विजयाची भिस्त असेल, असा अंदाज महायुतीतील नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पारवे या मतदारसंघातून कॉंग्रेसचे किती मतदार वळवण्यात यशस्वी ठरतात, यावरच पारवे व रश्मी बर्वेचा जय-पराजय अवलंबून राहणार असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत.

तुमानेंच्या कामी आली नाही निष्ठा...

कृपाल तुमाने यांनी बंडखोरीच्या वेळी एकनाथ शिंदेंसोबत निष्ठा दाखवली. आता त्यांना उमेदवारी नाकारल्याने निष्ठेचे काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे, तर दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना उमेदवारी दिल्याने भाजप व शिवसेनेतील कार्यकर्ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. ही नाराजी दूर करण्यास पक्षश्रेष्ठी व उमेदवाराला कितपत यश मिळते, यावरही जय-पराजय ठरणार आहे.

Edited By : Atul Mehere

R

Raju Parve
Ramtek Lok Sabha Constituency : काँग्रेसला रामटेक मतदारसंघात बंडखोरीचा फटका बसणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com