Ramtek Lok Sabha Election : 2019चा वचपा काढण्यासाठी गजभियेंची वंचितकडून उमेदवारी !

Kishor Gijbhiye : किशोर गजभिये मागील निवडणुकीत रामटेकमधून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होते. त्यावेळी सावनेरचे माजी आमदार सुनील केदार आणि माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी त्यांना उघडपणे विरोध केला होता.
Ramtek Lok Sabha Constiruency
Ramtek Lok Sabha ConstiruencySarkarnama

Ramtek Lok Sabha Election : रामटेक लोकसभा मतदारसंघात यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बंडखोरांचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात सध्या उत्साह संचारला आहे.

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, सेवानिवृत्त सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी आंबेडकरांच्या आवाहनाला साद घातली. काल (ता. 27) वंचित बहुजन आघाडीचा एबी फॉर्म घेऊन त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दुसरीकडे वंचितच्या वतीने भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर चहांदे यांनी उमेदवारी दाखल केली आहे. किशोर गजभिये मागील निवडणुकीत रामटेकमधून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होते. त्यावेळी सावनेरचे माजी आमदार सुनील केदार आणि माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी त्यांना उघडपणे विरोध केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ramtek Lok Sabha Constiruency
Ramtek Lok Sabha Election : कुंभारेंच्या माध्यमातून भाजपने साधला सुनील केदारांवर नेम !

राऊत बंडखोरी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखलसुद्धा झाले होते. राहुल गांधी यांनी फोनवरून आपणास उमेदवारी दाखल करण्यास सांगितल्याचा दावा त्यावेळी राऊत यांनी केला होता. सुनील केदार त्यावेळी त्यांच्यासोबत होते. मात्र, शेवटपर्यंत राऊतांचा एबी फॉर्म नागपूरमध्ये पोहोचलाच नाही. केदारांनी निवडणुकीत गजभिये यांना साथ दिली नाही. त्यामुळे बंडखोरी टळली.

या वेळीसुद्धा इच्छुकांच्या यादीत गजभिये यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, सुनील केदार रश्मी बर्वे यांच्यासाठी आग्रही होते. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने फक्त बर्वे यांचेच नाव पाठवण्याचा आग्रह केदार यांनी धरला होता. त्यांच्या हट्टासमोर कोणाचेच काही चालले नाही. याचा वचपा घेण्यासाठी या वेळी गजभिये यांनी बंडखोरी करून दंड थोपटल्याचे दिसते.

साखरेंचे बंडाचे निशाण...

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे पूर्व विदर्भाचे संघटक सुरेश साखरे यांनीसुद्धा रामटेकमधून बंडाचे निशाण फडकावले आहे. शिवसेनेचा खासदार असतानाही रामटेक काँग्रेससाठी सोडल्याचा त्यांचा रोष आहे. ते स्वतः रामटेकमधून उत्सुक होते. मात्र, आघाडीच्या वाटाघाटीत काँग्रेसने बाजी मारली.

Edited By : Atul Mehere

R

Ramtek Lok Sabha Constiruency
Ramtek Lok Sabha Election : ...आणि म्हणून महायुतीने राजू पारवेंच्या हाती दिला धनुष्यबाण !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com