Rana Vs Thackeray: राणांच्या कार्यकर्त्यांकडून हनुमान चालिसा पठण सुरू, पोलिस अलर्ट !

Chanting of Hanuman Chalisa in Police Colony Amravati: पोलिसांनी तेथे तगडा बंदोबस्त लावला आहे.
Workers of Rana.
Workers of Rana.Sarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray was going to interact with office bearers : उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याच्या पृष्ठभूमीवर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाकडून अमरावतीमध्ये हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर काल (ता. ९) दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांच्या बॅनर्स फाडण्यात आले होते. (Chanting of Hanuman Chalisa has been started in Police Colony)

पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही आज (ता. १०) गर्ल्स हायस्कूल चौकात राणांचे कार्यकर्ते हनुमान चालिसा पठण करणार होते. पण ज्या हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार होते, ते हॉटेल गर्ल्स हायस्कूल चौकातून जवळच आहे. त्यामुळे पोलिसांनी तेथे तगडा बंदोबस्त लावला आहे. त्यानंतर राणांच्या कार्यकर्त्यांनी तेथून जवळच असलेल्या पोलिस वसाहतीमध्ये हनुमान चालिसा पठण सुरू केले आहे.

सध्या ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरू आहे. शिवसेनेच्या वतीने आज (ता. १०) येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी काल रात्रीच उद्धव ठाकरे अमरावती शहरात दाखल झाले. या सभेच्या निमित्ताने ठिकठिकाणी शिवसेनेचे पोस्टर, बॅनर तसेच झेंडे लागले आहेत.

हे झेंडे लावत असतानाच गर्ल्स हायस्कूल चौकात शिवसैनिकांना राणा दांपत्याचे पोस्टर दिसले. त्यावरून संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी हे पोस्टर फाडून आपला रोष व्यक्त केला होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अमरावतीत येत असतानाच त्यांच्या विरोधात मुद्दामहून असे बॅनर लावण्यात आल्याचा शिवसैनिकांचा आरोप आहे. त्यावरून काल तापलेले वातावरण अद्यापही गरमच आहे.

Workers of Rana.
ठाकरेंची Bhavana Gawali'न वर जहरी टीका | Shivsena | Uddhav Thackeray | NCP | BJP | Sarkarnama

काल रात्री पोलिसांनी राणांच्या (Ravi Rana) काही कार्यकर्त्यांची धरपकड केली. तरीही आज सकाळी त्यांनी पोलिस (Police) वसाहतीमध्ये हनुमान चालिसा पठण सुरू केले आहे. तेथेही काही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांनी बंदोबस्त लावलेला आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) विरोध करणारी औलाद पैदाच झाली नाही, असे खासदार अरविंद सावंत म्हणाले. त्यावरून राणांचे कार्यकर्ते खवळले असल्याचे सांगण्यात येत आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com