Department of Revenue News : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत तलाठी (गट क) संवर्गातील एकूण ४ हजार ६४४ पदांसाठी अर्ज करण्यासाठी आज १७ जुलै शेवटचा दिवस आहे. अशात सकाळी ११ वाजेपासूनच वेबसाइट बंद दिसत आहे. आता अर्ज भरण्यासाठी केवळ काही तासच उरले असल्याने अनेक उमेदवारांना चिंता लागली आहे. (As few hours are left, many candidates are worried)
बहुप्रतीक्षित असलेली तलाठी पदभरती अखेर शिंदे फडणवीस सरकारने काढली. पहिल्यांदाच साडेचार हजारहून अधिक तलाठ्याची पदे भरली जाणार आहेत. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार असून चाचणी कॉम्प्यूटर बेस्ड टेस्ट असणार आहे. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील. ऑनलाइन परीक्षेप्रमाणे अर्ज करण्याची प्रक्रियासुद्धा ऑनलाइनच आहे.
२६ जूनच्या रात्री १२ वाचेपासून तर १७ जुलैच्या रात्री ११.५५ पर्यंत अर्ज भरण्यासाठी वेबसाइट खुली ठेवण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले आहे. ई-महाभूमी या महसूल व वनविभागाच्या वेबसाइटवर तलाठी पदभरतीची ऑनलाइन लिंक उपलब्ध आहे. मात्र ही वेबसाइट ऐन शेवटच्या दिवशी म्हणजे आज सकाळी ११वाजतापासून बंद दाखवत असल्याने अनेक उमेदवारांचा हिरमोड झाला आहे.
वेबसाइट अंडर मेंटनन्स दिसत असून संध्याकाळी सहा वाजता सुरू होईल, असे सांगण्यात येत आहे. तलाठी पदभरतीसाठी अर्ज भरता येत नाहीये. वेबसाइट अंडर मेंटनन्स असल्याचा मेसेज डिस्प्ले होत असून १७ जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता चेक करावे, असा मेसेज येत आहे.
शेवटच्या दिवशीच वेबसाइट अंडर मेंटनन्स कशी असू शकते, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. महसूल विभागाचा भोंगळ कारभार यानिमित्ताने पुन्हा एकदा उघड झाल्याने (Eknath Shinde) शिंदे-फडणवीस (Devendra Fadanvis) सरकारबद्दल तलाठी पदभरतीच्या उमेदवारांमध्ये रोष निर्माण झाला आहे. आमचा अर्ज जर भरला गेला नाहीतर याला सरकार जबाबदार असेल असा आरोप केला आहे.
हेल्पलाइनही नो-रिस्पॉन्स..
अर्ज भरतांना काही अडचण असल्यास ९१-९५१३४३८०४३ (टेक्नीकल) व ०२०२५७१२७१२ (नॉन टेक्निकल) असे दोन हेल्पलाइन नंबरही दिले आहेत. मात्र दोन्ही नंबर बंद आहेत. पहिल्या नंबरवर रिंग जातेय. पण कॉल कनेक्ट होत नाहीये. दुसरा नंबर तर उचलल्याच जात नसल्याचे विद्यार्थ्यांनी (Students) सांगितले.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.