
Winter Session News: राज्यातील जनतेच्या मनात गैरसमज पसरविण्यात सत्तापक्षाचा हातखंडा आहे. काल त्यांनी एयू वरून गदारोळ केला. वास्तविक पाहता रिया चक्रवर्तीने स्वतः एयू म्हणजे अनन्या उदास हे स्पष्ट केले आहे. अनन्या ही रियाची मैत्रीण आहे, हे आता स्पष्ट झाले आहे,' असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.
विरोधी पक्षातील नेत्यांनी आज सत्ताधाऱ्यांवर चांगलेच ताशेरे ओढले. दिशा सालियन मृत्युप्रकरणी एसआयटी बसवून सरकार ३२ वर्षीय तरुणाला किती घाबरले आहे, हे दिसून आल्याचे जितेंद्र आव्हाड (JItendra Awhad) म्हणाले. तर आम्ही सत्यमेव जयते, हे तत्व मानणारे आहोत तर सरकार सत्तामेव जयते मानते. सरकारने आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, तरी आम्ही दबणार नाही, असे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सांगितले.
जयंत पाटील यांचे निलंबन लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले. कर्नाटक सरकार कुरघोडी करत असताना आपले सरकार काहीच करत नसल्याचा खेददेखील त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात कर्नाटकचे मुख्यमंत्री सतत आघाडीवर दिसतात, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री माघार का घेत आहेत, हे कळत नाही. आता त्यांनी ठोक भूमिका घेऊन तसा तगडा ठराव सभागृहात मांडला पाहिजे, असेही अशोक चव्हाण यांनी सांगितले.
कर्नाटक सरकार हाय-हाय ने दुमदुमला परिसर..
विरोधकांनी आज कामकाजावर बहिष्कार टाकत विधानसभेच्या पायऱ्यांवर येऊन सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. सीमाप्रश्नावर विरोधकांनी सरकार हमको घबराती है, कर्नाटक को डरती है, कर्नाटक सरकार हाय हाय, अशा घोषणांनी सभागृहाचा परिसर दणाणून सोडला. यावेळी महाविकास आघाडीच्या सदस्यांनी काळ्या फिती लावून हातात निर्लज्ज सरकारचे बॅनर घेऊन सरकारचा निषेध करीत स्वतःला खोके, महाराष्ट्राला धोके, खोके-बोके, कर्नाटक सरकार मुजोरी करते, महाराष्ट्र सरकार कुंभकर्णी झोपते, सीमा प्रश्नी भूमिका घ्या, नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा घोषणांची सरबत्ती सरकारवर केली.
घोषणाबाजी करीत सर्व सदस्य पायऱ्यांवर बसले. यावेळी भास्कर जाधव यांनी रश्मी शुक्ला प्रकरण, एनआयटीचे भूखंड प्रकरण, शिंदे-फडणवीस सरकारचा भ्रष्टाचार बाहेर येऊ नये, म्हणून गोंधळ घालून जयंत पाटलांचे निलंबन केले. हिंमत असेल तर आमच्या सर्वांचे निलंबन करा, असा इशाराही दिला. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या शैलीत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा चांगलाच समाचार घेतला. वर्षा गायकवाड यांनीही महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी सत्ताधारी सदस्य व राज्यपालांवर परखड टीका केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.