Rohit Pawar on Chakankar : राजकारणाच्या पलीकडे ज्यांचे ज्ञान नाही, त्यांच्यावर बोलायचं नाही !

Ajit Pawar : अजित पवारांवरही त्यांनी निशाणा साधला.
Rupali Chakankar and Rohit Pawar
Rupali Chakankar and Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Political News : ज्यांना केवळ आणि केवळ राजकारणच कळतं. राजकारणाच्या पलीकडे ज्यांना काही ज्ञान नाही, अशा लोकांबद्दल मला काहीही बोलायचे नाही, असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) रोहित पवार यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) गटाच्या रूपाली चाकणकर यांचा समाचार घेतला. (He also targeted Ajit Pawar)

आज (ता. १३) सकाळी रोहित पवार नागपुरात दाखल झाले. येथे येताच त्यांनी खास नागपुरी तर्री पोह्यांवर ताव मारला. त्यानंतर दीक्षाभूमीवर अभिवादन करण्यासाठी आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, संधी असताना सत्तेत न जाता मी संघर्षात सहभागी होण्याच्या विचाराने आलो आहे. या वेळी अजित पवारांवरही त्यांनी निशाणा साधला.

‘त्या’ आमदारांच्या सुरक्षेवर १५० कोटी...

जे ४० आमदार शिंदे (Eknath Shinde) गटासोबत गेले. त्यांच्या सुरक्षेवर वर्षात दीडशे कोटी खर्च, जाहिरातींवर ५० कोटी, ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या एका सभेला १० कोटी खर्च येतो, हे खर्च सरकारने (State Government) कमी केले पाहिजे. आजचे नेते राज्य चालवण्यासाठी सक्षम नाहीत. ३० लाख तरुण नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत, राज्य सरकार त्यांची चेष्टा करत असल्याचाही आरोप पवार (Rohit Pawar) यांनी केला.

शरद पवारांचे विचार त्यांनी पोहोचवले नाहीत...

विदर्भाची जबाबदारी ज्या नेत्याला दिली, तो फक्त त्याच्या जिल्ह्यापर्यंतच मर्यादित राहिला. त्याला साहेबांनी केंद्रात मोठी जबाबदारी दिली, पण त्या नेत्याने साहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले नाही, असे म्हणत पवारांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर गंभीर आरोप केले.

अजित पवारांनी विश्‍वासघात केला...

ज्यांनी विचार बदलला आणि जे पूर्वी भाजपच्या विरोधात बोलले, ते आज भाषण करण्यासाठी काहीही बोलत असतील, तर ते खरं समजण्याचे काही एक कारण नाही. अनेक वेळा आमच्या आमदारांच्या सह्या त्यांनी घेतल्या. आम्ही सर्व आमदारांनी त्यांच्यावर विश्‍वास केला, पण त्यांनी आमच्यासोबत विश्‍वासघात केला.

माझे पहिले समर्थन होते, असे आमदार अमोल मिटकरी म्हणतात. पण मला आता त्यांच्यावर जास्त बोलून वेळ वाया घालवायचा नाही. आमचं वय पाळण्यातलं आहे, असं त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा विषय आहे. आजही आम्ही शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार जपले आणि याच विचारांनी महाराष्ट्रात काम करणार आहोत, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

Rupali Chakankar and Rohit Pawar
Rohit Pawar on Shinde : ‘बोलायचं आणि मोकळं व्हायचं’ म्हणजे नेमकं काय? नागपुरातून पवारांचा शिंदेंवर निशाणा !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com