RSS Dussehra 2023 Rally : नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने मोठ्या उत्साहात विजयादशमीचा उत्सव साजरा केला जात आहे. संघाच्या (RSS) वतीने भव्य पथ संचालनाचे आयोजन केले होते. यानंतर संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण झाले. भाषणातच त्यांनी आपला देश अनेक क्षेत्रात प्रगती करत असून, निरंतरपणे पुढे जात आहे, अशी भावना व्यक्त केली. तसेच त्यांनी मणिपूरमधील हिंसाचारावरही भाष्य केले. (Latest Marathi News)
भागवत म्हणाले, "आपण इकडे-तिकडे काही घटना पाहतो, मणिपूर राज्याचीही परिस्थिती पाहतो, तिथं हे सगळं कसं घडलं? मैतेई आणि कुकी समाज इतकी वर्षे एकत्र राहत आहेत, एकत्र नांदत आहेत. यांच्यामध्ये अचानकच विभागले जाण्याची भावना कशी निर्माण झाली? अशा विभागल्या गेलेल्या समाजाचा फायदा कुणाकुणाला होतो?"
"22 जानेवारीला एकाच वेळी सगळे लोक जाऊ शकत नाहीत. सुरक्षेचा मु्द्दा असेल, हळूहळू नंतर आपल्या सुविधेनुसार जाऊ. त्या विदशी आपल्या संपूर्ण देशात, आपापल्या ठिकाणी छोट्या मंदिरात धार्मिकतेचं असं वातावरण बनवू शकतो. भगवान राम हे धर्माच्या मर्यादेचं प्रतीक आहेत. यामुळे आत्मिकतेचं, सर्वसमावेशकतेचे, समरसतेचे वातावरण, धार्मिकतेचं वातावरण असं देशात निर्माण होईल, असे छोटे छोटे कार्यक्रम आपण करू शकतो, असे आवाहनही भागवत यांनी केले.
(Edited By - Chetan Zadpe)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.