Sakoli APMC Result : पटोलेंच्या मतदारसंघात डाॅ. फुकेंनी राष्ट्रवादीच्या साथीने काॅंग्रेसला दिला धक्का!

Dr. Parinay Fuke : डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वातील पॅनलला मोठा विजय मिळाला आहे.
Dr. Parinay Fuke and Nana Patole.
Dr. Parinay Fuke and Nana Patole.Sarkarnama

Bhandara District's Sakoli APMC Election Result News : भंडारा जिल्ह्यातील लाखनी-साकोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे नागपूर जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष लागलेले होते. कारण कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा हा विधानसभा मतदारसंघ आहे. येथे पटोलेंना लोकांनी नाकारल्याचे दिसून येत आहे. माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वातील भाजप-राष्ट्रवादी कॉंग्रेस-शिवसेनेच्या (शिंदे गट) पॅनलला मोठा विजय मिळाला आहे. (Dr. The panel led by Parinay Phuke has won big)

यासंदर्भात भाजप नेते यांनी काल (ता. २८ एप्रिल) भाकीत केले होते, की येथे कॉंग्रेसला लोक नाकारतील, ते आजच्या निकालाने तंतोतंत खरे ठरले आहे. लाखनी-साकोलीमध्ये भाजप राष्ट्रवादी शिवसेना-शिंदे गट पॅनलने १४ जागांवर विजय मिळविला आहे. तर कॉंग्रेसचे नाना पटोले यांनी केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले. भाजप नऊ, राष्ट्रवादी काॅंग्रेस पाच आणि काॅंग्रेसला चार जागांवर विजय मिळाला आहे.

सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण गटातून शिवराम सोनबा गिरिपुंजे, प्रेमकुमार महादेव गहाणे, उमराव काशीराम आठोडे, महेश सदासिव पाटील, विनायक सोमा बुरडे, डॉ.अजय देवराम तुमसरे आणि अविनाश आनंदराव ब्राह्मणकर हे विजयी झाले. ग्रामपंचायत गट सर्वसाधारण गटातून श्रावण कापगते आणि सैलेश गजभीये यांनी विजय मिळवला. व्यापारी गटातून कैलाश जगनाडे, सेवा सहकारी संस्था इतर मागास गटातून रामकृष्ण दिवान वाढई, सेवा सहकारी संस्था विमुक्त भटक्या जाती गटातून दादाराम परसराम कागदे, तर सेवा सहकारी संस्था महिला गटातून लता कापसे व हेमलता मेंढे या विजयी झाल्या.

भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील साकोली-लाखनी बाजार समितीची निवडणूक सुरुवातीपासून चर्चेत राहिली. कारण कॉंग्रेसचे हेवीवेट नेते, प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचा हा तालुका आहे आणि येथेच भाजपचे नेते, माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके जम बसवण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या बाजार समितीच्या निवडणुकीत तरी परिणय फुके यांनी पटोलेंवर मात केली आहे. ही निवडणूक आगामी निवडणुकांची रंगीत तालीम समजली जाते. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल हा नाना पटोलेंसाठी इशारा आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Dr. Parinay Fuke and Nana Patole.
Ramtek APMC Election Results : केदार-जयस्वाल युतीचा सुपडा साफ; जुन्या कार्यकर्त्यांनीच दिला झटका !

यापूर्वी लाखनी-साकोली बाजार समितीमध्ये भाजप (BJP) आणि नाना पटोले (Nana Patole) सोबत होते. कारण सात वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीच्या (APMC Election) वेळी पटोले भाजपमध्ये होते. तेव्हा ते खासदार होते. त्यावेळचे नानांचे समर्थक शिवराम गिरीपुंजे हे सध्या भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यामुळे नानांचा हा गट भाजपसोबत राहिला. उद्या (ता. ३०) पवनी आणि लाखांदूर बाजार समित्यांसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच सायंकाळी मतमोजणी होणार असून निकाल लागणार आहेत.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com