Sambhaji Bhide Controversial Statement : अटकपूर्व जामिनासाठी संभाजी भिडेंची न्यायालयात धाव..

Sambhaji Bhide On Mahatma Gandhi: पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे.
Sambhaji Bhide
Sambhaji Bhide Sarkarnama
Published on
Updated on

Amravati News: महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे हे अटकपूर्व जामिनासाठी आज (सोमवारी) न्यायालयात धाव घेणार आहेत. त्यांच्या विरोधात अमरावती येथील राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमरावतीमध्ये भिडे यांनी महात्मा गांधी यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केले असून त्यांच्या या विधानावरून राज्यातील वातावरण तापलं आहे. भिडेंच्या विधानामुळे शुक्रवारी (२८ जुलै) विधानसभेत विरोधी पक्षातील नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे.

Sambhaji Bhide
Prithviraj Chavan News : पृथ्वीराज चव्हाणांना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात ; शंभूराज देसाई यांचा चव्हाणांना फोन

महात्मा फुले, साईबाबा यांच्याबद्दलही वादग्रस्त विधान

महात्मा गांधी यांची बदनामी करणारे संभाजी भिडे यांनी महात्मा फुले आणि साईबाबा यांच्याबद्दलही वादग्रस्त विधान केल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यांच्या भाषणाची दुसरी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. महात्मा फुले यांचे समर्थकही भिडेंच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. त्यांनी भिडेंचा निषेध केला.

देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

अमरावतीत गुन्हा दाखल झाल्यानंतर भिडे त्यांच्या अटकपूर्व जामीनासाठी आज (सोमवारी) त्यांच्या समर्थकांकडून जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे. काँग्रेस नेत्या, आमदार यशोमती ठाकूर या आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी अकरा वाजता धरणे आंदोलन करणार आहेत. संभाजी भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Sambhaji Bhide
Pravin Darekar slams Uddhav Thackeray : सत्ता गेल्याने उद्धव ठाकरेंच्या पोटात मळमळ सुरू.. ; दरेकरांनी डिवचलं

भिडे हे अफजल खानाच्या वकिलाचे वंशज ?

यशोमती ठाकूर यांनी पुन्हा संभाजी भिडेंवर निशाणा साधला आहे. संभाजी भिडे हे अफजल खानाच्या वकिलाचे वंशज असल्याची प्रतिक्रिया ठाकूर यांनी दिली आहे. ठाकूर यांनी संभाजी भिडे यांच्याबाबत अपशब्द वापरला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे आणि शिवप्रतिष्ठानचे महानगरप्रमुख निषादसिंह जोध यांनी कार्यकर्त्यांसह कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये यशोमती ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com