Samruddhi Highway : देवेंद्र फडणवीस यांनी विकायला काढला समृद्धी महामार्ग ! पण का ?

Devendra Fadanvis : अंत्योदयातून मोदींचा GDP ग्रोथचा फॉर्म्यूला, पेन्शनवर केला प्रहार.
Samruddhi Highway - Devendra Fadanvis
Samruddhi Highway - Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

11 डिसेंबर 2022 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पण केलेला समृद्धी महामार्ग पूर्ण झाल्यावर विकण्याची योजनाच आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली. त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. सुरुवातीला 35 हजार कोटी रुपयांना हा मार्ग तयार करताना लोकांनी राज्य सरकारचे दिवाळे निघेल, अशा वल्गना केल्या होत्या.

आता समृद्धी महामार्ग पूर्ण तयार होण्यास 50 किलोमीटरची लांबी बाकी असताना या मार्गासंबंधी सिक्युरिटाईजेशनची ऑफर आल्याची माहिती आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आतापर्यंत समृध्दी महामार्गावर 55 हजार कोटी खर्च झाले असून तो पूर्ण झाल्यावर 60 ते 70 हजार कोटींना विकण्याची तयारी फडणवीस यांनी दर्शवली. इतक्यावर ते थांबले नाही तर या पैशातून इतर ठिकाणी नवी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली. एका कार्यक्रमात गुंतवणूक योग्य ठिकाणी करण्याचे धडे देताना त्यांनी हे विधान केले.

Samruddhi Highway - Devendra Fadanvis
Samruddhi Mahamarg News : 'समृद्धी'वरील प्रकल्पांना मोदी सरकारकडून निधीची शक्यता; अहवाल केंद्राकडे पाठवणार..

पेन्शन ही कन्सेप्ट नाही..

जुन्या पेन्शनसाठी आंदोलन करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा उल्लेख न करता फडणवीस यांनी खाजगी क्षेत्रात पेन्शन ही कन्सेप्ट नसल्याचे सांगत युवकांना त्यांच्या लाइफ स्पॅनमध्येच पुरेसा पैसा मिळत असून त्यांनी योग्य प्रकारे गुंतवणूक करत वृद्धापकाळाची सोय करण्याची गरज व्यक्त केली. स्मार्ट गुंतवणूकदार व्हा व सरकारच्या भरवशावर न राहण्याचा सल्ला फडणवीस यांनी दिला आहे. शेअर बाजार, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना या बाजारपेठेचा अभ्यास आवश्यक असल्याचे फडणवीस म्हणाले. नाही तर 'शार्ट टर्म गेन करताना लाँग टर्म मध्ये झटका बसतो', असे ते म्हणाले.

गडचिरोली देशाची स्टील कॅपिटल होणार..

विदर्भात नक्षलवाद प्रभावित जिल्हा म्हणून परिचित असलेला गडचिरोली देशाचे स्टील कॅपिटल होत असल्याची माहिती फडणवीस यांनी या कार्यक्रमात दिली. समृध्दी महामार्ग तयार झाल्याने विदर्भाचे चित्र बदलल्याचे ते म्हणाले. तर समृध्दी महामार्गावरील जिल्ह्यांचा विकास होत आहे. गडचिरोलीत आताच 30 हजार कोटींची आणि या महिन्यात 10 हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. आर्टीफिशल इंटेलिजन्स च्या माध्यमातून जगभरात 22 कोटी नोकऱ्या जाणार होत्या. पण, त्याच वेळी आर्टीफिशल इंटेलिजन्सच्या माध्यमातून 25 कोटी नव्या नोकऱ्या मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. जग आणि जॉबचे नेचर बदलत असल्याचे फडणवीस म्हणाले.

अंत्योदयातून मोदींची GDP ग्रोथ..

अंत्योदयाच्या विकासातून मोदींचा जीडीपी ग्रोथ चा नवा फॉर्म्यूला तयार केल्याची माहिती यावेळी फडणवीस यांनी दिली. गरिबांची क्रयशक्ती वाढविण्यात आली. इतक्यावर मोदी थांबले नाही तर त्यांनी 11 कोटी शौचालय बांधले. हे तयार करताना त्यावर आधारीत 32 इंडस्ट्रीजमध्ये नव्याने कामे निर्माण झाली. असेच 5 कोटी घरे उभारताना नवी डिमांड निर्माण केली आणि जीडीपी वाढविण्यात यश प्राप्त केले..

मोदी सरकारच्या नऊ वर्षाच्या काळात 25 कोटी लोक हे बीपीएल (BPL) अर्थात गरिबी रेषेच्या वर आल्याचा दावा फडणवीस यांनी केला. डेमोग्राफी, डेमोक्रसी आणि डिमांड या त्रिसूत्रीच्या आधारे मोदींनी देशातील 140 कोटी ग्राहकांची शक्ती ओळख सुनिश्चित केली. त्यामुळेच जगाच्या तुलनेत अकराव्या स्थानावर असलेली आपली अर्थव्यवस्था ही आता पाचव्या स्थानावर आल्याचा दावा त्यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

युवाशक्तीमुळे विकसित भारत..

विकसित भारत हे युवकांमुळे शक्य होणार आहे. तरुणांच्या संख्येमुळे भारत 2020 ते 2035 या काळात आपल्या उच्चांकावर राहील आणि त्यानंतर 2035 ते 2050 या कालावधीत विकासाचे मार्ग स्थिर असतील. म्हणजेच 2047 पर्यंत भारत विकसित देश होईल. मोदींनी अर्थव्यवस्थेचा विस्तार करताना सर्वसामान्यांच्या गरजांवर फोकस केला. डिजिटल ट्रान्झेशनमध्ये भारत जगात पहिल्या स्थानावर आहे. त्याच बरोबर स्टार्टअप इकोसिस्टम मध्ये जगात भारत दुसऱ्या स्थानावर आहे.

महाराष्ट्र पहिल्या स्थानावर असल्याचे फडणवीस म्हणाले. मोदींनी पुढील पाच वर्षांत भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या स्थानावर आणण्याचे ठरविले आहे. काँग्रेस नेते राजीव गांधी सांगत सरकारी योजनेत 1 रुपया पाठविल्यावर 85 पैशांचा भ्रष्टाचार होत होता. पण, आता मोबाईल, आधार आणि डिबीटीने एक रुपया टाकला तर तितकेच पैसे लाभार्थ्यांना मिळतात, हे मोदींनी करप्शन फ्री सिस्टिमने शक्य केल्याचे फडणवीसांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com