Narendra Modi : शिंदेंच्या पाठीवर मोदींची कौतुकाची थाप ; म्हणाले,"टेकडीच्या गणपतीला माझं वंदन..

PM Narendra Modi samruddhi mahamarg : पंतप्रधानांनी ‘नागपूर मेट्रोचा पहिला टप्पा’ राष्ट्राला समर्पित केला.
PM Narendra Modi samruddhi mahamarg news update
PM Narendra Modi samruddhi mahamarg news updatesarkarnama
Published on
Updated on

PM Narendra Modi samruddhi mahamarg : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते आज (रविवारी) राज्याच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे (samruddhi mahamarg) लोकार्पण झाले आहे.

"आज संकष्टी चतुर्थी आहे, टेकडीच्या गणपतीला माझं वंदन.." अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीतून भाषणाला सुरवात केली. यावेळी उपस्थितांनी एकच जलोष केला.

समृद्धी महामार्ग हा शिंदे-फडणवीस सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. नरेंद्र मोदी यांनी रा्ज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली, हा क्षण माध्यमांनी टिपला. शिंदे-फडणवीस यांचं कौतुक मोदींनी आपल्या भाषणात केलं.

मोदींनी नागपूर दाखल होत सर्वप्रथम वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा कंदील दाखवला आहे. ही ट्रेन नागपूर ते बिलासपूर दरम्यान धावणार आहे. यादरम्यान सुमारे 590 कोटी रुपये आणि 360 कोटी रुपये खर्चून पुनर्विकास करण्यात येणाऱ्या नागपूर रेल्वे स्थानक आणि अजनी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली.

PM Narendra Modi samruddhi mahamarg news update
Ink Attack : चंद्रकांतदादांच्या सूचनेनंतरही ११ पोलीस निलंबित ; कुणाच्या आदेशावरुन कारवाई ?

पंतप्रधानांनी ‘नागपूर मेट्रोचा पहिला टप्पा’ राष्ट्राला समर्पित केला. खापरी मेट्रो स्टेशनवर त्यांनी खापरी ते ऑटोमोटिव्ह स्क्वेअर (ऑरेंज लाइन) आणि प्रजापती नगर ते लोकमान्य नगर (एक्वा लाइन) या दोन मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यानंतर पंतप्रधान मोदींनी नागपूर मेट्रोने फ्रीडम पार्क ते खापरी असा प्रवास केला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नागपूर मेट्रोच्या फ्रीडम पार्क स्टेशनवर पंतप्रधानांनी तिकीट खरेदी केले.

पंतप्रधान मोदींचे ढोल- ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी खुद्द मोदींनीही ढोल वाजवण्याचा मोह आवरता आला नाही. मोदींनी यावेळी ढोल वाजवण्याचा आनंद घेतला. यावेळी पंतप्रधान मोदींसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com