Sanjay Raut On Nitin Raut : विदर्भातील सर्वच जागांवर काँग्रेसचा दावा; संजय राऊतांचाही शेलका टोला, म्हणाले...

MVA Vidarbh Vidhan Sabha Seat : महाविकास आघाडी विदर्भातील किमान 50-55 जागा जिंकेल अशी स्थिती असल्याचेही राऊतांनी सांगितले.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Vidarbh Political News : नागपूर जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागात मिळून विधानसभेच्या 62 जागा आहेत. त्यातील चार जागा लढवण्यावर शिवसेना ठाकरे गटाचे शिवसैनिकांचा हट्ट आहे.

मात्र काँग्रेसनेते नितीन राऊत यांनी विदर्भातील सर्व जागा लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शेलक्या शब्दात नितीन राऊतांना टोला लगावला आहे.

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शहरातील दोन आणि ग्रामीण भागातील दोन, अशा चार जागा लढवाव्यात असा आग्रह आहे. नागपूर दौऱ्यावर असलेल्या संजय राऊतांनी Sanjay Raut मात्र दोन जागा लढवू असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, नितीन राऊतांच्या सर्व जागा लढवण्याबाबत केलेल्या विधानावरून राऊतांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

राऊत म्हणाले, नितीन राऊत Nitin Raut आमचे मित्र आहेत. त्यांनी जर काँग्रेस विदर्भातील सर्व 62 जागा लढवत असेल तर आम्हाला काही हरकत नाही. उर्वरीत महाराष्ट्रातील सर्व जागा आम्ही ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट लढवू, अशी मिश्किल टिप्पणी केली. हा गमतीचा भाग आहे. महाविकास आघाडीतील विभागनिहाय जागा वाटपाबाबत 20 आणि 21 ऑगस्ट रोजी बैठका होणार आहेत, त्यावेळी काय तो निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Sanjay Raut
Sanjay Raut : राजेंद्र शिंगणेंवरून संजय राऊतांचा अमित शाह, देवेंद्र फडणवीसांवर घणाघात; म्हणाले...

महाविकास आघाडीला विदर्भात चांगले यश मिळणार असल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला आहे. विदर्भात 62 जागा आहेच. त्यातील किमान 50 ते 55 जागा महाविकास आघाडी जिंकेल, अशी आजमितीला परिस्थिती आहे. महाविकास आघाडीत जागा वाटपात कोणाचेही पाय ओढायचे नाही, असे ठरले आहे. त्यातून एकत्र येऊनच जागांबाबत निर्णय घेऊ, असेही राऊतांनी सांगितले.

Sanjay Raut
Shahajibapu Patil : शहाजीबापूंनी दीपक साळुंखेंना डिवचले; ‘मला मैदान सोडायची सवय नाही, निवडणूक ताकदीने लढणार’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com