Buldhana:विकास कामांच्या भूमिपूजन समारंभात संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील दलित महिला सरपंचांचा अवमान करणं भाजपा आमदार संजय कुटे यांच्या अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आमदार संजय कुटे यांच्या विरोधात सरपंच प्रतिमा इंगळे यांनी तक्रार दाखल केली आहे .
बुलढाणा जिल्हातील दलित संघटना , सरपंच संघटना तसेच अनेक सामाजिक संघटना एकवटल्या असून आमदार कुटे यांचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे. डॉ. संजय कुटे यांनी मी दलित असल्याने माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली आहे, असे सरपंच इंगळे यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
त्यामुळे आता बुलढाणा पोलिस काय भूमिका घेतात? आमदार कुटेंवर गुन्हा दाखल होणार का? हे बघणे महत्त्वाचं आहे. रिपाईचे नेते सचिन खरात यांनी सुद्धा या घटनेचा निषेध केला आहे. भाजपातून आमदार कुटे यांची हकालपट्टी करा, अशी मागणी खरात यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
संजय कुटे हे फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. 2004पासून म्हणजे गेल्या 18-19 वर्षांपासून ते बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव-जामोद विधानसभा मतदारसंघातून भाजपचं प्रतिनिधित्त्व करीत आहेत. 2014 साली महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचं सरकार आलं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, तेव्हा शेवटच्या मंत्रिमंडळ विस्तारात कामगार कल्याण मंत्री आणि बुलडाण्याचं पालकमंत्री म्हणून डॉ. संजय कुटेंची निवड झाली. डॉ. संजय कुटेंनी बुलडाणा भाजपचं जिल्हाध्यक्षपद, महाराष्ट्र भाजपचे सरचिटणीस आणि महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष अशी पक्ष संघटनेतली पदंही भूषवली आहेत
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.