शेगाव : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची 'भारत जोडो यात्रा' सध्या महाराष्ट्रात आहे. राहुल गांधी यांची ही यात्रा (Bharat Jodo Yatra) ७ सप्टेंबरला कन्याकुमारी येथून निघाली होती. केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र असा प्रवास करत ही यात्रा बुलढाण्यातील शेगावपर्यंत पोहोचली आहे. (Rahul Gandhi, Bharat Jodo Yatra Latest News Shegaon)
दरम्यान, आज त्यांची यात्रा बुलढाण्यातील शेगाव येथे पोचली असून येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना राहुल गांधी यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र, स्वातंत्र्यावीर सावरकर यांच्यावर त्यांनी केलेल्या टीकेवर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली असून मित्रपक्ष शिवसेनेने देखील यावर नाराजी व्यक्त केली आहे. यावर ते आपल्या भाषणात काही बोलतील, असे अनेकांना वाटले होते. मात्र, त्यांनी याबाबत सावरकरांवर केलेल्या टीकेचा आणि त्या वादाचा साधा उल्लेखही केला नाही.
राहुल यांनी आपल्यी भाषणात भाजपवर टीका करतांना म्हणाले की, भाजप देशात भीती आणि हिंसा पसरवण्याच काम करत आहे. नेमक त्याचं विरोधात ही आमची यात्रा आहे. यात्रेच लक्ष जनतेच दु:ख समजून घेण्याच आहे. लोंकाशी भेटल्यावर लोकांच्या भावना समजतात. द्वेषाने देशाचे नुकसान होते. विरोधी लोक म्हणतात भीती कशाची तर त्यांना सांगतो की, गेल्या सहा महिन्यात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांचं दु:ख या सरकारला समजत नाही. यामुळे लोकांना जोडण्यासाठी आमची ही यात्रा आहे.
ते पुढे म्हणाले की, द्वेषामुळे देशाला कधीही फायदा होणार नाही. मागच्या काही महिन्यापासून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नाही. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांच एक लाखांच कर्ज माफ केलं जातं नाही मात्र उद्योगपतीचं कर्ज माफ केलं जातं, असा सवालही राहुल यांनी सरकारला विचारला.
पंतप्रधान मोदींनी जर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा आवाज ऐकला तर शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. पण याकडे ते लक्ष देत नाहीत. देशाला मोठ्या-मोठ्या उद्योगपतीच्या हातात देण्याचं काम सध्या सुरू आहे. पण आम्ही असा भारत कधीही होऊ देणार नाहीत.
देशाला दिशा देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी आहे. शाहू, फुले, आंबेडकरांची ही भूमी आहे. महाराष्ट्राच्या जनतेने मला दिलेल्या प्रेमाला मी आयुष्यभर विसरणार नाही, असे म्हणत त्यांनी आपलं भाषण संपवलं या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.