Shivsena News : पक्षांतर विरोधी कायद्यामुळे पूर्वी एकट्याने होणारे पक्षांतर एकत्रितपणे होऊ लागले. म्हणून, २००३ मध्ये करण्यात आलेल्या घटनादुरुस्तीनुसार केवळ वैयक्तिकच नव्हे तर सामूहिक पक्षांतरालाही घटनाबाह्य घोषित केले गेले. हे लक्षात घेता शिंदेंनी पक्षद्रोह केला, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी येथे माध्यमांशी बोलताना केला.
आज सकाळी नागपुरात आले असता खासदार सावंत विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, एक म्हणजे शिंदेंनी स्वेच्छेने पक्ष सोडला. दुसरे म्हणजे कायद्यानुसार पक्ष सोडल्या नंतर सोडणाऱ्यांना स्वत:चा स्वतंत्र गट तयार करता येत नाही. त्यांना दुसऱ्या पक्षात विलिन व्हावे लागते. यांपैकी काहीही शिंदे गटाने केलेले नाही. शिवाय ते एकाच वेळी बाहेर पडले नाही. तर गटागटाने निघाले, याकडे सावंत यांनी लक्ष वेधले.
मातोश्रीवर ताबा मिळवणे हे दिवास्वप्न आहे. ते कधीच पूर्ण होणार नाही, असे ते म्हणाले. निवडणूक आयोगाने केवळ संख्याबळाचा विचार करीत भाजपच्या संहितेनुसार निर्णय दिला अशी टीकाही सावंत यांनी केली. या प्रकरणी निवडणूक आयोग घटनाबाह्य वागले, असा आरोप सावंत यांनी केला. शिवसेनेने १२४ जागा लढवल्या. त्यापैकी ५५ जागा निवडून आल्या. आताच्या बंडखोरांसह संपूर्ण १२४ जण शिवसेनेचा एबी फार्म आणि पक्षचिन्हावर लढले. मग पराभूत झालेल्यांची मते कोणाची होती, असा सवाल सावंत यांनी केला.
सीबीआय, (CBI) ईडी, (ED) आयकर खाते या प्रमाणे निवडणूक आयोगही आता विकाऊ झालेला आहे, अशी टीका सावंत यांनी केली. कोणालाच कशाची चाड राहिलेली नाही. निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक लगेच राज्यसभा वा निवडणूक आयोगावर होते. हे कशाचे लक्षण आहे, असे सावंत यांनी विचारले. घटनेच्या परिशिष्ट १० प्रमाणे आणि पक्षांतरबंदी कायद्यानुसार शिंदे गटाने केलेली बंडखोरी ही पक्षद्रोहच आहे, अशी टीका अरविंद सावंत यांनी येथे माध्यमांशी बोलताना केली.
पक्षांतर विरोधी कायद्यामुळे पूर्वी एकट्याने होणारे पक्षांतर आता एकत्रितपणे होऊ लागले आहे. म्हणून, २००३ मध्ये करण्यात आलेल्या घटनादुरुस्तीनुसार केवळ वैयक्तिकच नव्हे, तर सामूहिक पक्षांतरालाही घटनाबाह्य घोषित केले गेले. हे लक्षात घेता शिंदेंनी पक्षद्रोह केला हे स्पष्ट होते. एक म्हणजे शिंदेंनी स्वेच्छेने पक्ष सोडला.
दुसरे म्हणजे कायद्यानुसार पक्ष सोडल्यानंतर सोडणाऱ्यांना स्वत:चा स्वतंत्र गट तयार करता येत नाही. त्यांना दुसऱ्या पक्षात विलिन व्हावे लागते. यांपैकी काहीही शिंदे (Eknath Shinde) गटाने केलेले नाही. शिवाय ते एकाच वेळी बाहेर पडले नाही. तर गटागटाने निघाले, याकडे सावंत (Arvind Sawant) यांनी लक्ष वेधले. मातोश्रीवर ताबा मिळवणे हे दिवास्वप्न आहे. ते कधीच पूर्ण होणार नाही असे ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.