Strong Protection : राजभवन, विधानभवन, देवगिरी, रवीभवनाला सव्वाशे पोलिसांचा गराडा

Administration on Alert : उपराजधानी नागपुरात पोलिसांची सतर्कता
Devendra Fadnavis House at Nagpur
Devendra Fadnavis House at NagpurSarkarnama
Published on
Updated on

Impact of Protest in Nagpur : मराठा आरक्षणसंदर्भात राज्यभरात पेटलेल्या आंदोलनाचा भडका दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक ठिकाणी राजकीय पुढाऱ्यांची वाहने अडविण्यात येत आहेत. नेत्यांना घेराव, गावबंदी केली जात आहे. अशात उपराजधानी नागपूर पोलिस प्रशासन सतर्क झालेय. राजभवन, विधानभवन, देवगिरी, रवीभवनासह राजकीय पुढाऱ्यांचे येणे-जाणे असलेल्या ठिकाणांना सध्या सशस्त्र पोलिसांचा गराडा आहे. नागपुरातील धरमपेठ भागात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी निवासस्थान आहे. या परिसरातील पोलिस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणसंदर्भात राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात राजभवनाबाहेर सशस्त्र पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रवीभवनचे फाटकही बंद करण्यात आले असून, भवनाच्या आत येणाऱ्या प्रत्येक वाहनांची नोंद घेण्यास सुरुवात करण्यात आलीय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान ‘देवगिरी’ बाहेरही पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. येथेही नोंदवही ठेवण्यात आली असून, आत जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तपशिल पोलिस नोंदवून घेत आहेत. (Security increased for all party leaders in Nagpur in the wake of the Maratha protest for Reservation in Maharashtra)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी निवासस्थान धरमपेठेतील त्रिकोणी पार्क परिसरात आहे. सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आलीय. फडणवीस नागपुरात असतानाही या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असतो. मात्र, राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाच्या दृष्टीने खबरदारी म्हणून फडणवीस नागपुरात नसतानाही घरासमोर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलाय. रस्त्यावर बॅरिकेटही लावण्यात आले आहेत. राजभवन, रवीभवन, देवगिरी आणि फडणवीसांचे खासगी निवासस्थान आदी भागांमध्ये सुमारे सव्वाशे पोलिसांचा ताफा शिफ्ट पद्धतीनं तैनात करण्यात आल्याचं या परिमंडळाचे पोलिस उपायुक्त राहुल मदने यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरात सर्वच पक्षाच्या आमदारांच्या निवास आणि कार्यालयासमोर सुरक्षा वाढविण्यात आलीय. बहुतांश खासदार व आमदारांच्या घरांसमोर व कार्यालयांसमोर किमान एक अधिकारी व पाच ते सहा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी या सुरक्षा कर्मचाऱ्यांना संपर्क साधता यावा, यासाठी वॉकीटॉकी सेटही पुरविण्यात आले आहेत. झेड आणि झेड प्लस दर्जाची सुरक्षा असणाऱ्या नेत्यांच्या निवास व कार्यालयाबाहेर विशेष काळजी घेण्यात येत आहे.

राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरातील गस्तही वाढविण्यात आली आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांमधून पोलिस सातत्यानं गस्त घालत आहेत. अचानक होणारी निदर्शनं, घेराव, रास्ता रोको किंवा अन्य कोणत्याही आंदोलनाची माहिती पूर्वीच हाती यावी, यासाठी पोलिस विभागाची गुप्तचर यंत्रणाही कामाला लागली आहे. नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. या परिसरातील सुरक्षा यंत्रणा तशीही नेहमीच सतर्क असते, परंतु महाल व रेशीमबाग परिसरातील पोलिस गस्तही सध्या खबरदारीचा उपाय म्हणून वाढविण्यात आली आहे.

(Edited by : Atul Mehere)

Devendra Fadnavis House at Nagpur
Maratha Andolan : 'एक मराठा, लाख मराठा' घोषणा देत मुंबईत आमदार निवासाबाहेर वाहनांची तोडफोड; दोघे पोलिसांच्या ताब्यात

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com