निवडणूक प्रक्रियेतून होते प्रदेश प्रतिनिधींची निवड, प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा संबंध नाही !

पण प्रत्यक्षात तशी स्थिती नसून नागपूर (Nagpur) विभागाचे एपीआर दिनेश कुमार, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू हे महाराष्ट्राचे पीआरओ आहेत.
Congress, Nagpur
Congress, NagpurSarkarnama

नागपूर : कॉंग्रेस पक्षाच्या (Congress Party) प्रदेश प्रतिनिधींची निवड ही एका विशिष्ट प्रक्रियेतून केली जाते. त्यामध्ये पक्षाने ठरवलेल्या निकषांनुसार ही निवडणूक होते. त्यामुळे पक्षातील कुणाची निवड प्रदेश समितीवर होणार नसेल, तर त्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दोषी नाहीत, असे कॉंग्रेसकडून सांगण्यात आले.

एक प्रतिनिधी मंडळ दिल्लीत (Delhi) जाऊन प्रमुख निवडणूक अधिकारी मधुसूदन मिस्त्री तसेच इतर बड्या नेत्यांना भेटून तक्रार करणार असल्याचे असंतुष्टांनी काल सांगितले होते. पण प्रत्यक्षात तशी स्थिती नसून नागपूर (Nagpur) विभागाचे एपीआर दिनेश कुमार, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू हे महाराष्ट्राचे (Maharashtra) पीआरओ आहेत. या टीमने प्रदेश प्रतिनिधींची निवड प्रक्रिया राबविली आहे. यामध्ये नागपूर शहरातील मुख्य १८ लोकांचा समावेश करण्यात आला आहे.

प्रदेश समितीवर आपला समावेश व्हावा असे प्रत्येकालाच वाटत असते. पण त्यासाठी १८ जणांनाच पाठवायचे होते आणि संबंधितांनी निवडणूक प्रक्रिया राबवून ही निवड केलेली आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना दोषी धरणे चुकीचे आहे, असे कॉंग्रेसच्या एका बड्या नेत्याने ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले. नवोदय बॅंकेचे पैसे बुडवल्याप्रकरणी अशोक धवड दीड वर्ष जेलमध्ये राहून आले आहेत. अशा व्यक्तीची प्रदेश समितीवर प्रतिनिधी म्हणून निवड केल्यास पक्ष अडचणी येऊ शकतो. त्यामुळे वरिष्ठांनी घेतलेला हा निर्णय आहे. त्याचे खापर इतर कुणावर फोडणे कदापि योग्य नाही, असेही सांगण्यात आले आहे.

या प्रक्रियेमध्ये देशाचे मुख्य आहेत मधुसूदन मिस्त्री, राज्याचे प्रमुख (पीआरओ) आहेत पल्लम राजू तर नागपूर विभागाचे प्रमुख (एपीआरओ) दिनेश कुमार आहेत आणि जिल्ह्याचे प्रमुख (डीआरओ) विवेक सिंह हे आहेत. यामध्ये कॉंग्रेसच्या देशाच्या प्रमुख सोनिया गांधी. राज्याचे प्रमुख आमदार नाना पटोले आणि शहराचे प्रमुख आमदार विकास ठाकरे यांचा काही एक संबंध येत नाही, असेही सांगण्यात आले आहे. यामध्ये जे निकष ठरले त्याप्रमाणे डीआरओंनी प्रदेश समितीवर निवड केलेली आहे.

Congress, Nagpur
Rajya Sabha Election : प्रतापगढींची मराठीतून शपथ! यावरच काॅंग्रेस नेते खूष!!

विधानसभा निवडणूक लढलेले उमेदवार, माजी मंत्री किंवा माजी आमदार असलेले लोक, महाराष्ट्र प्रदेश स्टेट बोर्डवर असलेले लोक, अशांचा प्रदेश समितीवर समावेश केला जातो. आता निवड झालेल्यांमध्ये सर्व जण विधानसभा निवडणुकीचे उमेदवार राहिलेले आहेत. पुरुषोत्तम हजारे, बंटी शेळके, गिरीष पांडव, अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री, अविनाश पांडे, मुकुल वासनिक, विशाल मुत्तेंवार, अनिस अहमद, डॉ. नितीन राऊत यांचा समावेश झालेलाच आहे.

सतीश चतुर्वेदी यांच्या समर्थकांनी नाना पटोलेंवर निशाणा साधला आहे. पण त्यांचे समर्थक पूर्व नागपूरचे हजारे यांचा समावेश करण्यात आला आहे. चतुर्वेदींनी त्यांचे चिरंजीव दुष्यंत यांना शिवसेनेत पाठवले आणि ते विधान परिषद सदस्य आहेत. त्यामुळे दीपक कापसे यांच्यासह सर्व कार्यकर्ते शिवसेनेत गेले आहेत. म्हणून त्यांना समितीमध्ये घेण्याचा प्रश्‍नच नाही, अशीही माहिती कॉंग्रेसकडून देण्यात आली आहे

असे आहेत प्रदेश प्रतिनिधी..

प्रदेश प्रतिनिधी म्हणून विलास मुत्तेमवार, अविनाश पांडे, आमदार डॉ. नितीन राऊत, आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, अनीस अहमद, रामकिशन ओझा, पुरुषोत्तम हजारे, गिरीश पांडव, बंटी शेळके, प्रफुल्ल गुडधे, राजकुमार कमनानी, प्रशांत धवड, विशाल मुत्तेमवार, उमाकांत अग्निहोत्री, अतुल कोटेचा, दीपक काटोले यांच्या नावाचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com