ACB ची नोटीस येताच आमदार देशमुखांचा खळबळजनक आरोप; थेट मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लिप असल्याचा दावा

Nitin Deshmukh News : या आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली
Nitin Deshmukh
Nitin DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Nitin Deshmukh News : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना एसीबीने नोटीस पाठवली आहे. नितीन देशमुख यांना त्यांच्या मालमत्तेबाबत जबाब नोंदवण्यासाठी 17 जानेवारीला एसीबी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश नोटीसमधून देण्यात आलेत. मात्र ही नोटीस आल्यानंतर देशमुख यांनी आपल्याविरुद्ध हे षडयंत्र असल्याचा आरोप करत यामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) हात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Nitin Deshmukh
Nana Patole News: मौजमस्तीसाठी आणि राज्याची तिजोरी लुटण्यासाठीच हे सरकार आहे...

तसेच आपल्याकडे तक्रार करणाऱ्याची आणि शिंदे यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला आहे. त्यांनी केलेल्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

या संदर्भात बोलताना देशमुख म्हणाले, ''तक्रारदार आणि एकनाथ शिंदे यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप माझ्याकडे आहे. तसेच मी लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रारदारासंदर्भात माहिती मागितली आहे. यामध्ये तक्रारदार तोच असल्याचं निष्पन्न झालं तर शिंदे आणि त्या व्यक्तीची ऑडिओ क्लिप मी माध्यमांसमोर ठेवणार आहे'', असं देशमुखांनी सांगितलं.

Nitin Deshmukh
Gopichand Padalkar Vs Ajit Pawar: इंदिरा गांधींचा पराभव झाला होता, तिथे अजित पवार किस झाड की पत्ती..

दरम्यान, नितीन देशमुखांना एसीबीची नोटीस आल्यामुळे आता ठाकरे गटाचा तिसरा आमदार अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याआधी सिंधुदुर्गमधील कुडाळचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांच्या मालमत्तेची मोजमापे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले होते.

तर त्या आधी ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांची एसीबीकडून बेकायदेशीर मालमत्ता बाळगल्याचा आरोप करत नोटीस बजावण्यात आली होती. दरम्यान, ठाकरे गटाच्या आमदारांना अशा प्रकारच्या आलेल्या नोटीसीमुळे ठाकरे गटाचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com