Sharad Pawar : सेवाग्रामच्या गांधी आश्रमात शरद पवारांनी केली ‘ही’ मोठी घोषणा !

Sevagram, Wardha : राज्यातील विविध ग्रामसभांची शक्ती वाढली पाहिजे..
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Sharad Pawar News : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे आदिवासी विकास केंद्र तत्काळ सुरू करू, अशी घोषणा ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी गांधी आश्रम, सेवाग्राम येथे केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निर्धार यात्रेच्या समारोपासाठी शरद पवार काल वर्धा येथे आले होते. दरम्यान त्यांनी सामूहिक वनहक्क धारक आदिवासी व इतर पारंपरिक वननिवासी गावांच्या राज्यस्तरीय परिषदेला हजेरी लावली.

यावेळी मंचावर सामूहिक वनहक्क व उपजीविका या विषयासंदर्भात राज्य व देश पातळीवर कार्यरत असलेले ज्येष्ठ व अनुभवी दिलीप गोडे, प्रतिभा शिंदे, ॲड. पूर्णिमा उपाध्याय, डॉ. किशोर मोघे, मोतीराम सयाम, अमित कळस्कर तसेच आमदार अनिल देशमुख, माजी आमदार सुरेश देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून खासदार शरद पवार यांनी सामूहिक वन हक्क आणि उपजीविका ग्रामसभा परिषदेसाठी गांधी आश्रम, सेवाग्रामची निवड केल्याबद्दल विदर्भ निसर्ग संरक्षण संस्था, विदर्भ व खान्देश उपजीविका मंच आदी संघटनांची प्रशंसा केली. जल, जंगल जमीन यांचे संवर्धन करणारा एकमेव घटक म्हणजे आदिवासी होय. राज्यातील विविध ग्रामसभांची शक्ती वाढली पाहिजे, असे ते म्हणाले.

ग्रामसभा ४० कोटींचा तेंदू, १५ कोटींचा महू, हिरडा, बेहडा यांसारखे काम विदर्भ ग्रामसभा महासंघ, विदर्भ निसर्ग संरक्षण संस्था यांसारख्या स्वयंसेवी संघटनांप्रमाणे सामूहिक वनहक्क आणि ग्रामस्थांच्या उपजीविकेसंदर्भातील कार्य राज्यस्तरावर उभे राहिले पाहिजे. तसेच या संघटनांचा एक संघ राज्यस्तरावर निर्माण झाला पाहिजे, असेही शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. या परिषदेत विदर्भ, खानदेश या विभागातील ग्रामसभा प्रतिनिधी व त्यांच्यासोबत कार्यरत खोज, व्हीएनसीएस, जीएसएमटी, लोकसमन्वय प्रतिष्ठान, साकव, ग्राम आरोग्य, रिवॉर्ड, वननिकेतन, इश्यु, संदेश या संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला.

Sharad Pawar
Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंचा शरद पवार, नाना पटोले, राज ठाकरेंना फोन ; म्हणाले..

गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, (Nagpur) यवतमाळ, अमरावती, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यातील सामूहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभांचे ७०० पेक्षा अधिक प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मंचावर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी डॉ. दिलीप गोडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर सामूहिक वनहक्क, राज्यातील स्थिती, वन, जल व कृषी आधारित आदिवासी उपजीविका व आव्हाने यावर अॅड. पूर्णिमा उपाध्याय यांनी पॉवर पॉइंट सादरीकरण केले.

सामूहिक वनहक्क व उपजीविका विषयासंदर्भात महाराष्ट्राच्या (Maharashtra) विविध जिल्ह्यात झालेले काम आणि वर्तमान आव्हाने याबद्दल त्यांनी माहिती दिली. मोतीलाल सयाम ( देवरी, गोंदिया), रामलाल काळे (अमरावती), पूजा भंगाळे (जळगाव-खान्देश-नंदुरबार) या ग्रामसभा सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर प्रतिभाताई शिंदे यांनी देखील ग्रामस्थांच्या सामूहिक वनहक्क व उपजीविका यासंदर्भात संबोधन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com