अनिल देशमुखांच्या तुरुंगातील प्रत्येक तासाची किंमत भाजपला चुकवावी लागेल!

एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि त्यांच्या पत्नीवर खटले भरले गेले.
Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama

नागपूर : राज्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करत आहे. काही लोकांच्या हातातून सत्ता गेली त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या लोकांना वेगवेगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. माजी गृहमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना तुरुंगात टाकले त्यांच्या प्रत्येक तासाची किंमत आज ना उद्या भाजपला मोजावी लागले, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिला.

Sharad Pawar
राष्ट्रवादीचे दुकान बंद करणार, या पटोलेंच्या वक्तव्यावर पवारांचे `जशास तसे` उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवार बोलत होते. यावेळी पवार म्हणाले, एक दिवस मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त माझ्याकडे आले त्यांनी मला सांगितले की अनिल देशमुख यांच्या विरोधात तक्रार आहे. ती तक्रार मला मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालायची आहे. मी विचारले काय तक्रार आहे. त्यांनी सांगितले की आम्हाला अशा सुचना दिल्या आहेत. मी विचारले तुम्ही त्या सुचनांचे पालन केले का? त्यांनी सांगितले नाही. पोलिस आयुक्तांची तक्रार देशमुख यांना समजली. ते माझ्याकडे आले ते म्हणाले आरोपांची शहानिशा होईपर्यंत मी राजीनामा देतो, असे पवार यांनी सांगितले.

आज देशमुख तुरुंगामध्ये आहेत हे कशामुळे घडले तर एका आयुक्तांच्या तक्रारीमुळे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने चौकशी केली. आज ते पोलिस आयुक्त कुठे आहेत, असा सवाल पवार यांनी केला. त्यांना राज्य सरकारने फरार घोषीत केले आहे. अनिल देशमुख प्रकरणात केंद्र सरकारने सत्तेचा गैरवापर केला, असा आरोप त्यांनी केला. एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते होते. अनेक वर्षे भाजपचे नेतृत्व केले. ते राष्ट्रवादीमध्ये आले त्यानंतर त्यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीवर खटले भरले गेले. काही नसताना एकनाथ खडसे यांची ही अवस्था केली गेली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर काही करता येत नाही म्हणून नातेवाईकांच्या घरी लोक पाठवले. त्या तपासात काही मिळाले नाही, तरी त्यांनी पाच दिवस घर सोडले नाही. त्या अधिकाऱ्यांनी सांगितले की पाच दिवस हलायचे नाही असे दिल्लीचे आदेश आहेत.

Sharad Pawar
काॅंग्रेसमधून आऊटगोईंग सुरूच; जालन्यातील शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल

हसन मुश्रीफ यांच्याकडेही काही सापडले नाही. आपल्या हातातून सत्ता गेली त्यामुळे अनेक जण अस्वस्थ आहेत. पण मी सांगतो, की सामान्य माणसाची ताकद घेऊन तुम्हाला पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही, असा इशारा पवार यांनी विरोधी पक्षाला दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com