Sindkhed Raja Constituency: काका विरुद्ध पुतणी लढत होणार? घरातूनच विरोध; शरद पवार कुणाला उमेदवारी देणार VIDEO पाहा

Gayatri Shingane Against Rajendra Shingane: "जे गद्दार खोके घेऊन पक्ष सोडून गेले त्यांना पक्षात घेत असतील तर मग निष्ठावंताच काय? असा प्रश्न उपस्थित करीत गायत्री शिंगणे यांनी डॉ. शिंगणे यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे.
Gayatri Shingane | Rajendra Shingane
Gayatri Shingane | Rajendra ShinganeSarkarnama
Published on
Updated on

संजय जाधव

Buldhana News: काका-पुतण्यांचे राजकारण महाराष्ट्राला नवीन नाही, पण आता विधानसभा निवडणुकीत थेट काकांना पुतणीने आव्हान दिल्याने विदर्भातील राजकारण तापलं आहे. माजी मंत्री असलेल्या काकांच्या विरोधात पुतणीने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातून (Sindkhed Raja Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून गायत्री शिंगणे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातील नेते, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) हे अजित पवार यांची साथ सोडून शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यासाठी त्यांचे प्रयत्नही सुरु असल्याचे दिसते. अशातच त्यांची पुतणी गायत्री शिंगणे यांनी त्यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला आहे. गायत्री या निवडणूक लढण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

सिंदखेडराजा मतदारसंघातील निष्ठावंत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या पक्षप्रवेशाला कडक विरोध केला आहे. राजेंद्र शिंगणे यांच्या पुतणी गायत्री शिंगणे यांनीही काकांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला आहे. "जे गद्दार खोके घेऊन पक्ष सोडून गेले त्यांना पक्षात घेत असतील तर मग निष्ठावंताच काय? असा प्रश्न उपस्थित करीत गायत्री शिंगणे यांनी डॉ. शिंगणे यांना विरोध केला आहे.

"जर त्यांना (काकांना) उमेदवारी दिली तर मी अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार," अशी ठाम भूमिका गायत्री शिंगणे यांनी घेतली आहे. राजेंद्र शिंगणेंविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून गायत्री शिंगणे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. गायत्री यांनी सिंदखेड राजा विधान मतदारसंघातून तयारी सुरु केली आहे.

आमचा शरद पवारसाहेबांवर विश्वास आहे. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या पक्षप्रवेशाला अद्याप त्यांनी ग्रीन सिग्नल दिलेला नाही. आम्ही पवारसाहेबांसोबत एकनिष्ठ राहून काम केले आहे. पक्ष फुटीनंतरही आम्ही पक्षासोबत राहिलो. पक्षाचे चिन्ह 'तुतारी'आम्ही घरोघरी पोहचवली आहे. काहीही झाले तरी मी निवडणूक लढणारच, 100 टक्के अपक्ष म्हणून लढणारच असे गायत्री शिंगणे यांनी ठामपणे सांगितले.

Gayatri Shingane | Rajendra Shingane
MVA Seat Sharing: काँग्रेसचं मोठा भाऊ ? काँग्रेसला ८४ तर शरद पवार पक्ष, उद्धव ठाकरे पक्षाला इतक्या जागा मिळणार

विदर्भातील माजी मंत्री, आमदार आमदार राजेंद्र शिंगणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. राजेंद्र शिंगणे हे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

काही दिवसापूर्वी राजेंद्र शिंगणे यांनी “मी अजित पवार यांच्याबरोबर नाईलाजाने गेलो”, असे सांगत त्यांनी शरद पवार यांचे कौतुक केले होते. तेव्हापासून शिंगणे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशा चर्चा सुरु आहे. राजेंद्र शिंगणे यांना घरातूनच आव्हान असणार आहे. सिंदखेड राजा मतदारसंघात काका विरुद्ध पुतणी लढत होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com