Sheikh Hussain News : ४०० लोकांना विकल्या ट्रस्टच्या जमिनी, शेख हुसेनच्या कोठडीत वाढ होणार?

Nagpur : ट्रस्टच्या नावावर असलेल्या जमिनीची ४०० लोकांना विक्री केल्याची माहिती समोर आली आहे.
Sheikh Hussain, Congress.
Sheikh Hussain, Congress.Sarkarnama

Former President of Nagpur City Congress Committee Sheikh Hussain News : नागपूर शहर कॉंग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष शेख हुसेन यांना हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टमध्ये घोटाळा केल्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. हुसेन यांच्यासह ट्र्स्टचे तत्कालीन सचिव वेलजी हेसुद्धा अटकेत आहेत. दोघांनाही आज मंगळवारपर्यंत (ता. ९) पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. आरोपींकडून आणखी माहिती घेण्यासाठी कोठडी वाढवण्याची मागणी करण्यात येणार आहे. त्यामुळे दोन्ही आरोपींच्या कोठडीत वाढ होण्याची शक्यता आहे. (There is a possibility of increase in the custody of both the accused.)

नागपूर (Nagpur) शहरातील मोठा ताजबाग येथील हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टमध्ये एक कोटी ५९ हजार रुपयांचा घोटाळा (Scam) केल्याप्रकरणी काँग्रेसचे (Congress) माजी शहराध्यक्ष व ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष शेख हुसेन अब्दुल जब्बार (वय ६८, रा. मस्कासाथ, जागनाथ बुधवारी) याला रविवारी (ता. ७) आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

तपासात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला त्यांनी ट्रस्टच्या नावावर असलेल्या जमिनीची ४०० लोकांना विक्री केल्याची माहिती समोर आली आहे. शेख हुसेन हे १ जानेवारी २०११ ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत ट्रस्टचे अध्यक्ष होते. पदावर असताना दोघांनी धर्मदाय आयुक्तांची परवानगी न घेता ऑडिटही केले नाही. पाच वर्षांत या दोघांनी एक कोटी ५९ हजार रुपयांचा अपहार केला.

या दोघांचा कालावधी संपल्यानंतर ताज अहमद अली अहमद सय्यद (वय ५४, रा. निराला सोसायटी, मोठा ताजबाग) यांनी सचिवपद स्वीकारले. त्यांनी ऑडिट करवून घेतले असता त्यात दीड कोटी रुपयांची हेराफेरी असल्याची माहिती समोर आली. त्यातून २२ सप्टेंबर २०२२ ला त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा घोटाळा समोर आला. सय्यद यांनी सक्करदरा पोलिसांत तक्रार दिली. यावरून पोलिसांनी शेख हुसेन व माजी सचिव इक्बाल इस्माईल वेलजी या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

Sheikh Hussain, Congress.
Nana Patole यांची Uddhav Thackeray यांच्यावर नाराजी |MVA | Congress| Snehal Jagtap|Sarkarnama Video

ट्रस्टचे अध्यक्ष असताना, शेख हुसेन आणि सचिव वेलजी यांनी त्यादरम्यान परिसरात आणि आजूबाजूला असलेल्या ट्रस्टच्या जमिनी त्यांनी ४०० लोकांना दोन ते तीन लाखांत विकल्याची माहिती पोलिस (Police) सूत्रांनी दिली आहे. त्याबाबतच्या बक्षीसपत्राचेही त्यांनी वाटप केल्याचे दिसते. त्या दिशेने आर्थिक गुन्हे शाखा तपास करीत असल्याची माहिती आहे. सध्या दोघांनाही मंगळवारपर्यंत कोठडी असून त्यात आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com