Shiv Sena City Chief News : शिवसेनेचा (ठाकरे गट) शहरप्रमुख विद्यार्थ्यांना विकत होता गुटखा, गुन्हे दाखल !

Patur of Akola District : अकोला जिल्ह्यातील पातूर शहरात ही कारवाई करण्यात आली आहे.
Uddhav Thackeray with others
Uddhav Thackeray with othersSarkarnama
Published on
Updated on

Akola District Political News : शाळकरी मुलांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणं शिवसेना ठाकरे गटाच्या शहर प्रमुखाला चांगलंच भोवलं आहे. पोलिसांनी कारवाई करीत तंबाखूजन्य पदार्थ जप्त करीत या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. अकोला जिल्ह्यातील पातूर शहरात ही कारवाई करण्यात आली आहे. (This action has been taken in Patur town of Akola district)

शाळकरी अल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यात येत असल्याच्या प्रकारानंतर स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी (ता. पाच) ही कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अकोला येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील पातूर शहरात पेट्रोलिंग करीत असताना हा प्रकार पथकाच्या निदर्शनास आला. अकोला ते पातूर रस्त्यावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब सामाजिक सभागृहाच्या समोर शिवसेना ठाकरे गटाच्या शहरप्रमुख असलेल्या निरंजन बंड यांचे 'कलश पान मसाला' नावाचे दुकान आहे.

या दुकानाजवळच नगरपालिकेची प्राथमिक शाळा आहे. शाळेच्या बाजूला मैदान आहे. त्यामुळे येथे नेहमी शाळकरी मुले-मुली खेळत असतात. दरम्यान, कलश पान मसाला दुकानाचा मालक निरंजन बंड हा १८ वर्षांखालील मुलांना महाराष्ट्र सरकारने बंदी घातलेले तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ (गुटखा पुड्यांची) विक्री करीत असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुकानाची अधिक चौकशी आणि पाहणी केली असता, पथकाला या दुकानातून अल्पवयीन मुलांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले.

या प्रकरणी एलसीबी पथकाने दुकानात असलेल्या व्यक्ती संतोष रामकृष्ण याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, हे दुकान निरंजन वासुदेव बंड यांच्या मालकीचे असल्याचे समोर आले. या वेळी पोलिसांनी पंचांसमक्ष दुकानाची पाहणी केली असता, दुकानात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. या वेळी पोलिसांनी खानदानी पान मसाला काळी पाकिटं, हेरिटेज तंबाखू पिवळे पाकीट, संजवनी तंबाखू एकूण १८० नग, नागीण तंबाखू एकूण नग ३००, शिवपंढरपुरी तंबाखू एकूण ५० नग, मेहुलछाप कलाली तंबाखू एकूण ६०, विविध कंपनींच्या सिगारेटसह प्रतिबंध गुटखा जप्त केला आहे.

या प्रकरणी कलश पान मसाला दुकानाचे मालक निरंजन वासुदेव बंड व दुकानात काम करणारा संतोष रामकृष्ण गवई यांच्याविरुद्ध ६(ए) आर/डब्लू २६ COTPA ACT २००३ अन्वये कायदेशीर कारवाई केली आहे. दरम्यान, पातूर शहर हे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या मतदारसंघात आहे. निरंजन बंड हे शिवसेना ठाकरे गटाचे पातूर शहर प्रमुख आहेत.

बच्चू कडूंनीही केली होती कारवाई...

अकोला जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री बच्चू कडू यांनी वेशांतर करून पातूर शहरात खुलेआम प्रतिबंधक गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्याच्या विरोधात स्टिंग ऑपरेशन केलं होतं. या वेळी बच्चू कडू यांनी पातूर शहरातील विविध पान मसाला दुकानांवर स्टिंग ऑपरेशन करत प्रतिबंधक गुटखा विक्रीचा गोरखधंदा समोर आणला होता. याचवेळी शिवसेना शहरप्रमुख निरंजन बंड याच्या दुकानावरदेखील बच्चू कडूंनी गुटखा विक्रीचा प्रकार उजेडात आणला होता. आता याच दुकानावर अकोला पोलिसांनी पुन्हा कारवाई केली आहे.

Edited By : Atul Mehere

Uddhav Thackeray with others
Akola-Amravati Loksabha News : ‘बाप नहीं, तो बेटेही सही’ अकोला, अमरावतीकरांची भावना; ‘कॅप्टन’चे ‘विमान’ झेपावणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com