Winter Session News : नागपूर (Nagpur) विधानभवन परिसरात सर्व राजकीय पक्षांची कार्यालये आहे. अधिवेशनाची घोषणा झाल्यानंतर सर्व कार्यालयांची साफ सफाई आणि रंग रंगोटी करण्यात आली. फलकंही स्वच्छ करण्यात आले. पण शिवसेना कार्यालयाचा फलक झाकून ठेवण्यात आला होता. तेव्हापासून हे कार्यालय कुणाला मिळणार, हा प्रश्न अनुत्तरित होता.
अधिवेशन (Assembly Winter Session) सुरू होण्याच्या काही दिवस आधी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना कार्यालयात आपले बस्तान बसवले होते. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यासह उद्धव आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे फोटोही लावले होते. काही दिवस ठाकरे गटाचे लोक येथे बसलेसुद्धा. पण काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे नागपुरात (Nagpur) आगमन झाल्यानंतर पुन्हा तोच प्रश्न चर्चेला आला. अखेर आज सकाळी त्या कार्यालयातून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटो हटवून तेथे शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला.
बाळासाहेबांची शिवसेना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाचे प्रतोद यांच्या नावाचे फलक लागले आणि जेथे समाजवादी पार्टी, शेकाप सारख्या छोट्या पक्षांची कार्यालये होती, त्या बॅरेक क्रमांक ५ मध्ये उद्धव ठाकरेंच्या गटाला कार्यालय देण्यात आले. हे कार्यालय विधानभवन इमारत परिसराच्या अगदी शेवटच्या भागाला फाटकाजवळ आहे. त्यामुळे शिवसेनेचे मुख्य कार्यालय शिंदे गटाला तर उद्धव ठाकरेंच्या गटाला धुऱ्यावर फेकल्यासारखे झाले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेचे दोन गट पडले. एकनाश शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांना सोबत घेत भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री पदाची माळ त्यांच्या गळ्यात आली. त्याचप्रमाणे त्यांना शिवसेनेच्या धुनष्यबाणावरही दावा केला. हे प्रकरण भारत निवडणूक आयोगाकडे प्रलंबित असताना विधिमंडळातील धनुष्यबाण चिन्ह झाकण्यात आले. येथील कार्यालयावरूनही मोठा वाद निर्माण झाला होता. या कार्यालय दोन्ही पक्षांकडून दावा करण्यात आला होता.
विधिमंडळ सचिवालयाने हे कार्यालय प्रथम ठाकरे गटाला दिले होते. कार्यालयात उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यासह बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोही लावण्यात आला होता. परंतु आज कार्यालयातील चित्र बदलले होते. कार्यालयात उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचा फोटो ऐवजी फक्त बाळासाहेब ठाकरे यांचाच फोटो होतो. शिवाय प्रतोद म्हणून शिंदे गटातील नेत्याचे नाव होते. तर एका कक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.