Sawarkar News : बलात्काराला राजकीय हत्यार म्हणून समर्थन देणारे सावरकर हिंदूंचे प्रेरणास्थान कसे; शिवानी वडेट्टीवारांचे खळबळजनक विधान..

Savarkar Controversyt : फुले, शाहू, आंबेडकरांसाठी कधीच मोर्चे काढत नाहीत.
Nana Patole, Shivani Wadettiwar and Chandrashekhar Bawankule.
Nana Patole, Shivani Wadettiwar and Chandrashekhar Bawankule.Sarkarnama

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरून राजकारण चांगलेच पेटले आहे. भाजप सावरकरांच्या समर्थनार्थ तर कॉंग्रेस त्यांच्या विरोधात संधी मिळेल तेथे आणि वाट्टेल तशी वक्तव्य करत सुटले आहेत. कॉंग्रेसमधून सावरकर विरोध करण्यासाठी आता माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार सरसावल्या आहेत. (Politics is well on fire because of Swatantra Veer Savarkar)

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे समर्थन करणाऱ्या भाजप नेत्यांच्या विरोधात आज शिवानी वडेट्टीवार यांनी मोर्चा उघडला. सावरकरांच्या विरोधात तोफ डागत त्या म्हणाल्या, ‘फुले, शाहू, आंबेडकरांसाठी कधीच मोर्चे काढत नाहीत. कुठला मोर्चा काढतात..? तर सावरकर मोर्चा काढतात आणि सावरकर मोर्चा काढून काय करतात? माझ्यासह इतर महिला भगिनी येथे उपस्थित आहेत.

सगळ्‍यांना भिती वाटत असेल कारण सावरकरांचे विचार काय होते, तर Rape is a Political Weapon and it should be use against your political opponent. म्हणजे काय? सावरकर म्हणायचे की, रेप हे पॉलिटिकल हत्यार आहे. हे तुम्ही आपल्या पॉलिटिकल विरोधात वापरलं पाहिजे. तर माझ्यासारख्या महिला भगिनीला, येथे उपस्थित महिला भगिनींना कसं सेफ वाटणार आहे आणि अशा लोकांचा प्रचार करत हे लोक रॅली काढतात.’

शिवाणी वडेट्टीवारांचा हा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. त्यावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून आधीच महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. आता त्यात शिवानी वडेट्टीवारांच्या या वक्तव्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी सावरकरांबद्दल केलेल्या सर्व विधानांबद्दल माफी मागावी आणि त्यानंतरच महाराष्ट्रात पाय ठेवावा, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला होता.

Nana Patole, Shivani Wadettiwar and Chandrashekhar Bawankule.
Vijay Wadettiwar News: … तर या देशात लोकशाही फक्त नावालाच राहील, असं का म्हणाले वडेट्टीवार ?

नाना पटोलेंना (Nana Patole) सडेतोड उत्तर देत, ‘राहुल गांधीच्या (Rahul Gandhi) केसालाही धक्का लागला, तर याद राखा, असा दम नाना पटोलेंनी भरला. सावरकरांच्या मुद्द्यावरून आधीच भाजप (BJP) आणि कॉंग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष भिडले आहेत. हा वाद शमताना दिसत नाही. त्यातच आता शिवाणी वडेट्टीवारांच्या या वक्तव्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com