Yavatmal Shivsena : वाघाडी जांब येथे शिवसैनिकाचा भोसकून खून; आरोपी पसार

Shivsainik Death : जुन्या वादातून खून झाल्याचा पोलिसांचा अंदाज
Yogesh Katpelwar
Yogesh KatpelwarSarkarnama
Published on
Updated on

Yavatmal Political News : यवतमाळ शहरालगतच्या वाघाडी जांब येथे शिवसैनिकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली. जागेवरच त्या शिवसैनिकाचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Yogesh Katpelwar
Balasaheb Thackeray : बाळासाहेबांच्या विचारांची धग कायम ठेवणाऱ्या शिवतीर्थकडे वळली लाखो पावले !

योगेश नरहरी काटपेलवार (वय ३६, रा. देवीनगर लोहारा) असे या शिवसैनिकाचे नाव आहे. योगेशचा मृतदेह घटनास्थळावरून शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या घटनेचा तापास सुरू केला आहे. (Latest Political News)

पोलिसांनी योगेशचा खून जुन्या वादातून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. तसेच पोलिसांनी तत्काळ तपास हाती घेत मारेकरी कोण याची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. शिवाय घटनास्थळाच्या आजूबाजूला असलेल्या एका संशयितासह महिलेलाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास ग्रामीण पोलिस स्टेशन यवतमाळ करीत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Yogesh Katpelwar
Suresh Kute News : 32000 कोटींचा समूह; पण सुरेश कुटेंचा आयुष्यात एकदाच विमान प्रवास! कारण काय ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com