Shivsena : उद्धव ठाकरेंकडे राहणार फक्त पाच आमदार, विदर्भातील ‘या’ खासदारांनी केला दावा !

Krupal Tumane : झिरवळ यांनी चुकीच्या पद्धतीने किंवा कुणाच्या तरी दबावाखाली तो निर्णय घेतला.
Krupal Tumane, Shivsena
Krupal Tumane, ShivsenaSarkarnama
Published on
Updated on

Uddhav Balasaheb Thackeray News : राज्याचा सत्तासंघर्षावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. निकाल आमच्याच बाजूने लागणार, यात शंका नाही. कारण त्यावेळचे उपसभापती नरहरी झिरवळ यांनी जो निर्णय दिला होता, तो चुकीचा होता. त्यांच्यावर अविश्‍वास प्रस्ताव दाखल झाला होता, असे शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार कृपाल तुमाने म्हणाले.

यासंदर्भात नागपुरात बोलताना खासदार तुमाने म्हणाले, भारताच्या संविधानाप्रमाणे जे सभापती किंवा उपसभापतींवर अविश्‍वास प्रस्ताव दाखल झालेला असतो, त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार नसतो. तरीही झिरवळ यांनी चुकीच्या पद्धतीने किंवा कुणाच्या तरी दबावाखाली तो निर्णय घेतला आणि आमच्या कोर्टाची पायरी चढण्याची वेळ आणली. पाच न्यायाधीशांचे खंडपीठ येत्या तीन ते चार दिवसांत आमच्या बाजूने निकाल देतील.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षामध्ये सध्या जे १६ आमदार दिसत आहेत, त्यातील केवळ पाचच आमदार भविष्यात तेथे दिसतील. त्यांचे १० आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि लवकरच आमच्याकडे येणार आहेत. हे आमदार यापूर्वीच आमच्याकडे येणार होते. पण दरम्यान त्यांनी विनंती केली की, एकदा न्यायालयाचा निकाल लागू द्या. त्यानंतर आम्ही येतो. त्यामुळे ही प्रक्रिया सध्या थांबलेली आहे. पण लवकरच ही प्रक्रिया पूर्ण करून आम्ही त्या गटाला पुन्हा एक जबर धक्का देणार आहोत, असे खासदार कुपाल तुमाने यांनी सांगितले.

या १० मध्ये विदर्भ, मराठवाडा, मुंबई, कोकण असे महाराष्ट्रभरातील आमदारांचा समावेश आहे. सध्याच त्यांची नावे सांगता येणार नाही. प्रवेश झाल्यानंतरच ती कळणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे पाच लोक नेहमी असतात, तेवढेच राहतील. बाकी सर्व आमच्याकडे येतील. एकंदरीतच जनतेसाठी समर्पित असलेले आमदार भविष्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात काम करणार आहेत. या १० मध्ये सुरत, गुवाहाटीवरून परत आलेल्या आमदारांचाही समावेश असेल असे म्हणत खासदार तुमाने यांनी अकोला (Akola) जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्याकडे इशारा केला आहे.

Krupal Tumane, Shivsena
...तर बिहारचाही महाराष्ट्र करून दाखवू : खासदार तुमाने

खासदार कुपाल तुमाने (Krupal Tumane) यांच्या दाव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली आहे. ते १० आमदार कोण, याचा शोध जो-तो आपआपल्या परीने घेत आहे. असे झाल्यास उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा गट पूर्णतः खिळखिळा करण्याचा सत्ताधाऱ्यांचा मनसुबा साध्य होणार आहे. पण यासाठी सत्तासंघर्षाच्या न्यायालयीन निकालाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com