ShivSena : महामोर्चाच्या दिवशीच ठाकरेंना धक्का; विदर्भातील नेत्याचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'

Akola News : अकोल्यात ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

Akola ShivSena News : अकोल्यातील ठाकरे गट शिवसेना प्रणित 'महाराष्ट्र एसटी कामगार सेने'चे प्रदेश कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाला अकोल्यात मोठा धक्का बसला आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत भाजप बरोबर सरकार स्थापन केल्यानंतर ठाकरेंना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर राज्यातील सेनेचे विविध पदाधिकारी हे शिंदे गटामध्ये गेल्याने त्यांना धक्यावर धक्के बसले. त्यानंतर आता ठाकरे गटाला अकोल्यात मोठा धक्का बसला.

विजय मालोकार यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पाठविला आहे. तसेच 'महाराष्ट्र एसटी कामगार सेने'च्या प्रदेश कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देखील त्यांनी भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत यांना पाठविला आहे. तर विजय मालोकार यांच्या राजीनाम्याने अकोल्यातील ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे.

Uddhav Thackeray
आघाडीच्या महामोर्चासाठी तीन कोटींचा खर्च? ठाकरेंचा पुढाकार, राष्ट्रवादीची साथ अन् काँग्रेसचा हात

पक्षातील वरिष्ठांच्या दुर्लक्षित धोरणांना कंटाळून मालोकारांनी पक्षाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. तर मालोकारांची पुढची राजकीय भूमिका नेमकं काय असणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विजय मालोकार (Vijay Malokar) हे अकोला (Akōlā) जिल्ह्यातील शिवसेनेच्या संस्थापक शिवसैनिकांपैकी एक आहेत. शिवसेनेत (Shiv Sena) जिल्हाप्रमुख, परिवहन महामंडळाचे संचालक, सहसंपर्कप्रमुख अशा विविध पदांवर त्यांनी काम केलेलं आहे.

१९९९ मध्ये मालोकार यांना तत्कालिन बोरगावमंजू मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी मिळाली होती. मात्र, त्यानंतरच्या दोन निवडणुकीत त्यांना पक्षानं डावलल्यामूळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढली होती. यात २००४ मध्ये त्यांनी ४० हजार मते मिळत अल्प मतांनी पराभूत व्हावं लागलं होतं. तर २००९ मध्ये 'जनसुराज्य पक्षा'चे उमेदवार म्हणून मालोकारांनी ३० हजार मते घेतली होती. दरम्यान, विजय मालोकार यांनी आपल्याकडे असणाऱ्या सर्व पदांचा राजीनामा दिल्याने या नंतर आता ते पुढे राजकीय भूमिका नेमकं काय घेणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Uddhav Thackeray
Shrikant Shinde : सत्ता गेल्यानंतर माणूस कसा फडफडतो; खासदार शिंदेंनी ठाकरेंना डिवचले

विजय मालोकारांची अशी आहे राजकीय कारकिर्द

विजय मालोकारांनी विविध पदे भूषवलेली आहेत. अकोला शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख, तसेच यवतमाळ आणि वाशिमचे माजी सहसंपर्कप्रमुख, १९९५ मध्ये युती सरकारच्या काळात एसटी महामंडळाचे संचालक, १९९९ मध्ये बोरगावमंजू (आताचा अकोला पूर्व) मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी, २००४ मध्ये बोरगावमंजू मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अत्यल्प मतांनी पराभव, तसेच अपक्ष उमेदवार म्हणून घेतली होती ४० हजारांवर मते, २००९ मध्ये अकोला पूर्व मतदारसंघातून अपक्ष म्हणून ३० हजार मतं घेतली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com