Nagpur Accident : नागपूर 'हिट अँड रन' केसमध्ये धक्कादायक खुलासा, सुनेनेच दिली सासऱ्याच्या हत्येची तब्बल एक कोटींची सुपारी

Nagpur Hit and Run Case : नागपूरच्या 'हिट अँड रन'केस मध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे. या केसमध्ये सूनेनं सासऱ्याच्या हत्येची सुपारी दिल्याचं उघडकीस आलं आहे.
Nagpur Accident
Nagpur AccidentSarkarnama

Nagpur Hit and Run Case : नागपूरच्या 'हिट अँड रन'केस मध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे. या केसमध्ये सुनेनेच सासऱ्याच्या हत्येची सुपारी दिल्याचं उघडकीस आलं आहे. नागपूर क्राईमच्या युनिट चारने या प्रकरणाचा तपास केला असता ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

नागपूरच्या (Nagpur) बालाजी नगर परिसरात 82 वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा 22 मे रोजी अपघातात मृत्यू झाला होता. एका भरधाव कारने त्यांना चिरडलं होतं. या अपघाताचे सीसीटीव्ही फूटेजदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. मात्र, हा अपघात नव्हता तर सुनियोजित कट असल्याचं आता समोर आलं आहे.

धक्कादायक बाब म्हणजे 300 कोटीच्या संपत्तीच्या हव्यासापोटी सुनेने सासऱ्याच्या हत्येची 1 कोटी रुपयांची सुपारी दिली होती. 1 कोटी रुपयांसोबतच बारचे लायसन्स आणि बारसाठी जागा देण्याचे आमिषदेखील सुनेने कार ड्रायव्हरला दिले होते. शिवाय ही सुपारी तिने नवऱ्याच्याच ड्रायव्हरला दिल्याचं आता उघड झालं आहे.

Nagpur Accident
Salman Khan Threat : सलमानला धमकवणाऱ्या बिश्नोई गँगचे मराठवाडा कनेक्शन उघड; वसीम चिकना पोलिसांकडून अटक

मृतक सासरे पुरुषोत्तम यांच्या हत्तेसाठी त्यांची सून अर्चना पुट्टेवार हिने सुनियोजित कट रचला. यासाठी तिने नवऱ्याच्या ड्रायव्हरला एक कोटी रुपयांचं आमिष दाखवलं. यासह बारसाठी जागा देण्याचं कबूल करत त्याला 17 लाख रुपये ॲडव्हान्सही दिला होता. आरोपी सून अर्चना ही गडचिरोली जिल्ह्यात सरकारी नोकरीत कार्यरत आहे. तर पोलिसांनी आता या प्रकरणात सुनेसह तीन आरोपींना अटक केल्याची माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com