Vidarbha : जलसंपदा विभागाचे विदर्भात एक काम दाखवा, १ लाखाचे बक्षीस मिळवा !

Wamanrao Chatap : विदर्भ निर्माण यात्रा काढण्यात येणार असल्याचे ॲड. वामनराव चटप यांनी सांगितले.
Vidarbha State Movement Committee
Vidarbha State Movement CommitteeSarkarnama
Published on
Updated on

Vidarbha State Movement Committee News : विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य हाच एकमेव पर्याय असून, विदर्भ राज्य निर्माण आंदोलनाचा लढा तीव्र करण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीद्वारे २१ फेब्रुवारी ते ५ मार्च पूर्व व पश्चिम अशा दोन्ही विभागांत विदर्भ निर्माण यात्रा काढण्यात येणार असल्याचे विदर्भवादी नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी अकोला येथे माध्यमांना सांगितले.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात अर्थमंत्र्याकडून सादर करण्यात आलेल्या पुरवणी अर्थसंकल्पात जलसंपदा विभागाच्या मागण्यांमधून विदर्भ गायब झाला असून, कायमचा हद्दपार करण्यात आला आहे. दुर्दैवाने राज्याचे अर्थमंत्री व जलसंपदा मंत्री विदर्भातील मूळ गाव मूलचेच असताना नागपूरहून राज्याच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी ‘कुऱ्हाडीचे दांडे गोतास काळ’ हा रोल पूर्णपणे अदा केला असल्याचे दिसून येत आहे.

विदर्भातील एकही काम या अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे जलसंपदा विभागाचे विदर्भात एक काम दाखवा व एक लाख रुपये मिळवा, अशी भूमिका विदर्भ राज्य आंदोलन समितीने जाहीर केली आहे. तशा आशयाचे फलक जिल्ह्याजिल्ह्यांत लावण्याचा निर्णय कार्यकारिणीने जाहीर केला आहे. जलसंपदा विभागाच्या पूरक मागण्या व विनियोजनात विदर्भातील अकराही जिल्ह्यात जलसंपदा विभागाचे एक ही काम समाविष्ट करण्यात आलेले नाही, असा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला आहे.

विदर्भातील १२० तालुके व ६२ विधानसभा मतदार संघांत जलसंपदा विभागाचे एकही काम समाविष्ट न करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा अर्थ, नियोजन व जलसंपदा मंत्र्यांनी विदर्भाच्या जलसंपदा विभागाचे एकही काम समाविष्ट न करून विदर्भ द्वेष आचरणातून दाखवून दिला आहे. त्यांच्या या कृतीचा विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने कोअर कमिटीच्या बैठकीत जाहीर निषेध करण्यात आला आहे.

Vidarbha State Movement Committee
Prashant Kishor : मागणीचा रेटा रचनात्मक पद्धतीने पुढे नेल्यास स्वतंत्र विदर्भ राज्य शक्य...

कोअर कमिटीच्या बैठकीत विदर्भ (Vidarbha) राज्य आंदोलन समितीद्वारे २१ फेब्रुवारी ते ५ मार्चपर्यंत पूर्वेकडील कलेश्वर (सिरोंचा) येथून एक प्रचार यात्रा निघणार असून, दुसरी प्रचार यात्रा राजमाता जिजाऊंचे माहेर असलेल्या बुलढाणा (Buldana) जिल्ह्यातील सिंदखेड राजा (Sindakhed Raja) येथून निघणार आहे. दोन्ही प्रचार यात्रांचा समारोप नागपूर (Nagpur) येथे ५ मार्चला होणार आहे. याद्वारे संपूर्ण विदर्भभर जनजागृती करून विदर्भाचे आंदोलन तीव्र करण्याचे आजच्या बैठकीत ठरवण्यात आले आहे.

या बैठकीला ॲड. वामनराव चटप, प्रा. प्रभाकर कोंडबत्तूवार, शंकरराव कवर, डॉ. निलेश पाटील, सतीश उंबरकर, सुरेश जोगळे, श्याम देशमुख, दिनेश भाकरे, भाऊराव वानखडे, अरविंद तायडे, सतीश देशमुख, स्वप्निल राऊत, सुरेश अगरकर आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com