Bhandara News : अजितदादांच्या भाषणात घोषणाबाजी करणाऱ्याला मुख्यमंत्र्यांनी बोलावून घेतलं

Eknath Shinde : हेलिपॅडवर निवेदन स्वीकारत शिंदेंनी दिला संवेदनशीलतेचा परिचय
Prahar Protester in Bhandara
Prahar Protester in BhandaraSarkarnama

Gosikhurd Project : ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार भाषण देत असताना घोषणाबाजी करणाऱ्या प्रहारच्या कार्यकर्त्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेत संवेदनशीलतेचा परिचय दिला. भंडारा येथे सोमवारी (ता. २०) कार्यक्रम सुरू असताना प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील प्रहार गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या कार्यकर्त्याने घोषणाबाजी केली होती. वसंत पडोळे असे आंदोलकाचे नाव आहे.

पोलिसांना हुलकावणी देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण सुरू असताना पडोळे यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळं पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. तत्काळ त्यांना सभास्थळापासून लांब नेण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध करून ठेवलं होतं. (Showing Sensitivity Chief Minister Eknath Shinde Accepted Gosikhurd Project Affected Protester's Letter At Bhandara)

अजित पवार यांचं भाषण सुरू असताना झालेल्या घोषणाबाजीनं झालेल्या गोंधळाकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंही लक्ष होतं. कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. कार्यक्रम आटोपल्यानंतर नागपूरकडं रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांकडून नेमका काय प्रकार होता, याची माहिती घेतली. पोलिसांनी सविस्तर घटनाक्रम मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातला. त्यामुळं निवेदन स्वीकारायला काय हरकत आहे, आंदोलकाला बोलावून घ्या, असे निर्देश शिंदे यांनी पोलिसांना दिलेत.

मुख्यमंत्र्यांनीच आदेश दिल्यानंतर पोलिस यंत्रणा कामाला लागली. घोषणाबाजी करणाऱ्या पडोळे यांना घेऊन पोलिस रवाना झालेत. मात्र, तोपर्यंत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा ताफा रवाना झाला होता. हेलिपॅडवर पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी पोलिसांना आंदोलकाला बोलावलं का, याबद्दल पुन्हा विचारणा केली. काही क्षणांतच पोलिस पडोळे यांना घेऊन मुख्यमंत्र्यांजवळ पोहोचले. मुख्यमंत्र्यांनी पडोळे यांच्याकडील निवेदन स्वीकारले. गोसीखुर्दच्या प्रकल्पग्रस्तांची माहिती घेतली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भंडाऱ्यातून ‘टेकऑफ’ करण्यापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी पडोळे यांचे निवेदन बारकाईनं वाचलं. गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न मोठा आहे. गंभीर आहे. त्यामुळं यासंदर्भात आपण व्यक्तिश: लक्ष देणार असल्याची ग्वाही शिंदे यांनी पडोळे यांना दिली. यासंदर्भात आवश्यक ती माहिती संकलित करून सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली. कोणत्याही सभा, संमेलन, रॅली आदीदरम्यान अशा प्रकारचं आंदोलन झाल्यानंतर पोलिस संबंधितांना ताब्यात घेतात. मंत्री, नेते मात्र बरेचदा आंदोलकांकडे ढुंकूनही पाहत नाहीत. परंतु मुख्यमंत्री शिंदे यांनी दाखविलेल्या संवेदनशीलतेमुळं वसंत पडोळे यांच्यासह गोसीखुर्दच्या सर्वच प्रकल्पग्रस्तांनी समाधान व्यक्त केलं आणि अधिकाऱ्यांनीही सुटकेचा श्वास घेतला.

Edited by : Prasannaa Jakate

Prahar Protester in Bhandara
Bhandara News : एकनाथ शिंदे विरोधाला न जुमानता काम करताहेत, अजितदादांनी केली पाठराखण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com