Winter Session : विधानभवनावर आज धडकणार सहा मोर्चे; शहरातील दोन मार्गांत बदल..

March on Assembly : आतापर्यंत एकूण ६३ संघटनांना मोर्चासाठी परवानगी देण्यात आली आहे.
Winter Session
Winter SessionSarkarnama
Published on
Updated on

Assembly Winter Session : नागपूर (Nagpur) हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धनगर समाज युवा मल्हार सेना, विदर्भ राज्य आंदोलन समिती, आशा व गट प्रवर्तक कर्मचारी संघटना आदी सहा मोर्चे विधानभवनावर धडकणार आहे. अधिवेशन काळात आतापर्यंत एकूण ६३ संघटनांना मोर्चासाठी परवानगी देण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासंदर्भात पोलिसांचा कस लागणार आहे.

अधिवेशनाच्या (Assembly Winter Session) पहिल्याच दिवशी म्हणजे, सोमवार १९ डिसेंबर रोजी एकूण सहा मोर्चे निघणार आहेत, तर आठवड्यात म्हणजे १९ ते २२ डिसेंबर या कालावधीत ४१ मोर्चे विधान भवनावर धडकणार आहेत. आजच्या मोर्चात धनगर समाज युवा मल्हार सेना, विदर्भ (Vidarbha) राज्य आंदोलन समिती, आशा व गट प्रवर्तक कर्मचारी (युनियन), शहर विकास मंच, लोकाधिकार परिषद, लोककला सेवा मंडळ (ऑल इंडिया) एनजीओ यांचा समावेश आहे. सर्वच मोर्चे यशवंत स्टेडियम येथून निघणार असून मॉरिस कॉलेज चौक, टेकडी रोडवर थांबतील. अंबाझरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या पुनर्बांधणीच्या मागणीसाठी पहिल्या आठवड्यात चार मोर्चे धडकणार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसर अंबाझरी बचाव कृती समितीतर्फे २० डिसेंबर तर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, बहुजन समाज पार्टी तर्फे २३ डिसेंबर रोजी मोर्चा निघेल. यासोबतच पहिल्याच दिवशी १९ डिसेंबर रोजी शहर विकास मंचातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित स्थळांचे संरक्षण, विकास व संवर्धन करण्यात यावे आदींसह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. तीन वर्षानंतर नागपुरात अधिवेशन होत असल्याने सरकारपर्यंत मागण्या पोहोचविण्यासाठी मोर्चेकरी सरसावले आहेत. मोर्चाला परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू असून नेमका आकडा सांगता येणार नाही, असे पोलिस विभागाकडून सांगण्यात आले. मात्र, सध्या ६३ मोर्च्यांना परवानगी मिळाली आहे, तर २० धरणे व अन्य काही आंदोलकांना परवानगी मिळाल्याची माहिती आहे.

Winter Session
maharashtra winter session : नागपूर अधिवेशन धोक्याचे! शिंदे-फडणवीसांना सांभाळावे लागणार

काही मोर्चे दर वर्षी निघतात. यात दिव्यांग बांधवांची संघटना, आशा गट प्रवर्तक अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यातही विविध संघटनांतर्फे मोर्चे काढले जातात. दिव्यांग बांधवातही दोन संघटना आहेत. मोजकेच कार्यकर्ते मोर्चात सहभागी होतात. मात्र, पोलिसांसाठी मोर्चे डोकेदुखी ठरतात. त्या दृष्टिकोनातून पोलिसही सज्ज आहे. बहुतांश मोर्चे यशवंत स्टेडियम येथून निघत असल्याने या कालावधीत सीताबर्डी मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. तसेच काही मोर्चे चाचा नेहरू बालोद्यान येथून निघतात त्यामुळे लोखंडी पूल मार्गावरीलही वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला. त्याचबरोबर इंदोरा मैदान, रेशिमबाग मैदान, लिबर्टी टॉकिज चौक या ठिकाणांहून मोर्चे निघत असल्याने वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com