Nitin Gadkari on Politics : ..तर लोक जातीपातीच्या वर उठून मतदान करतील...; गडकरींनी सांगितला निवडणूक जिंकण्याचा फॉर्म्युला...

Maharashtra BJP Politics : लोक अत्यंत हुशार आहेत. ते म्हणतात, जे देत आहेत ते ठेवून घ्या. आपल्याच बापाचा माल आहे.
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : जातीय दंगलीमुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. यावरून विरोधकांनीही भाजपवर जाती-पातीच्या राजकारणावरून विरोधक टोकाची टीका करत असतात. पण जातीपातीच्या राजकारणाला काहीही स्थान नाही, आपल्याला मिळून समाजाचं हित करायचं आहे. अशी भूमिका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडली आहे. इतकेच नव्हे तर, लोकांच्या मनात विश्वास निर्माण करा,तोच लाँगटर्म आहे, याला कुठलाही शॉर्टकट नाही, असा सल्लाही गडकरींनी दिला आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या आयोजित एका कार्यक्रम ते बोलत होते. गडकरी म्हणाले, " लोक अत्यंत हुशार आहेत. ते म्हणतात, जे देत आहेत ते ठेवून घ्या. आपल्याच बापाचा माल आहे. मात्र मत त्यालाच देतात. ज्यांना त्यांना द्यायचे आहे. ज्यावेळी तुम्ही लोकांच्या मनात तुमच्याबद्दल विश्वास निर्माण करता, तेव्हा तो जात-धर्म-पंथ-भाषा यापेक्षा तो तुमच्यावर जास्त प्रेम करेल. त्याला कुठल्याही पोस्टर बॅनरची गरज नाही. कुठलही आमिष दाखवण्याची गरज नाही. त्यांचा आपल्यावर विश्वास असतो आणि हा लाँगटर्न आहे, याला कुठलाही शॉर्टकट नाही, असही गडकरींनी स्पष्ट केलं.

Nitin Gadkari
Monsoon Session 2023 : आम्हाला काहीच नाही, अन् अजित पवारांच्या आमदारांना ५० कोटी, सर्व पुरावे आहेत, पण…

याचवेळी त्यांनी निवडणूक प्रचारातील एक गमतीशीर किस्साही सांगितला. गडकरी म्हणाले, मतदार खूप हुशार असतात. ते सर्वांनी दिलेला माल ठेऊन घेतात पण ज्या उमेदवाराला त्यांना मत द्यायचे असते, त्यालाच मतदान करतात. निवडणूक प्रचारात उमेदवार अनेक फंडे आजमावत असतात. पोस्टर्स लावून, कार्यकर्ते आणि मतदारांना जेवणावळ्या देऊन निवडणुका जिंकू शकतो, असं काहींना वाटतं. पण माझ्या यावर विश्वास नाही. मी अनेक निवडणुका लढवल्या. जिंकण्यासाठी सर्व प्रयोगही केले. एकदा निवडणुकीत तर एक-एक किलो सावजीचे मटण घराघरात पोहोचवण्याचेही काम झाले. पण तरीही निवडणूक हरलो.

माझ्याकडे अनेक लोक येतात, मी या जातीचा- त्या जातीचा सांगतात. पण जातीपातीचा काही उपयोग होत नाही, मी परवाच सांगितलं जो करेल जातीची बात, त्याच्यावर पडेल लाथ, अशी मिश्लिक टीप्पणीही त्यांनी यावेळी केली. जातपात काही नाही, आपण सगळे एक आहोत. आपण मिळून काम करु, मिळून राहू आणि मिळून समाजाचं हित करू, असही गडकरींनी यावेळी नमूद केले.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com