Pankaja Munde News : 'पंकजा मुंडेच्या नसानसात भाजप, त्या पक्ष सोडणार नाही'

BJP News : भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने या अफवा असल्याचे नमूद केले आहे.
Pankaja Munde News
Pankaja Munde NewsSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर छापा टाकत केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने मोठी कारवाई केली आहे. कारखान्याची १९ कोटी रुपयांची मालमत्ता आयुक्तालयाकडुन जप्त करण्यात आलीय. भाजपच्या प्रस्थापित नेत्यांशी उघड स्पर्धा करीत असल्यामुळे मुंडे यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची चर्चा आहे. यावर भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने या अफवा असल्याचे नमूद केले आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले, जीएसटी विभागाची कारवाई आधीपासूनच सुरू होती. यात्रा काढल्यामुळे मुंडे यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची बाब अफवा आहे. जीएसटीच्या चौकशीला मुंडे योग्य उत्तर देतील असे ते म्हणाले. भाजप आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. पंकजा मुंडे यांचा पक्ष सोडण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांच्या नसानसात भाजप (BJP) भिनले आहे. त्यामुळे त्या भाजपला सोडणार नाहीत, भाजपही त्यांना सोडणार नाही, असे बावनकुळे म्हणाले. पंकजा मुंडे यांच्या बोलण्याचा अर्थ असा काढण्यात येतोय की त्या भाजप सोडणार आहे. असा अर्थ कुणीही काढु नये. अडचणीच्या काळात आपण स्वत:ही त्यांच्याशी बोलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Pankaja Munde News
Maratha Protest News : नोंदी नाही तर आरक्षण नाही, ही सरकारची भूमिका चुकीची...

प्रत्येक समाजाला आरक्षण पाहिजे, यासाठी मागणी करणे प्रत्येक समाजाचा अधिकार आहे. ओबीसीचे आरक्षण जाऊ नये, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, धनगर समाजालाही न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी होत आहे. कुणावरही सरकार अन्याय करणार नाही. भाजपचे शासन सर्व समाजाला न्याय देईल, असे बावनकुळे यांनी सांगितले. ओबीसी समाजातील उपोषणकर्त्यांना बैठकीला बोलवले आहे. या बैठकीत आपल्याला बोलाविण्यात आले नाही, असे अजिबात नाही. आपण सर्वपक्षीय बैठकीत होतो. ओबीसींचे (OBC) आरक्षण सरकारला अजिबात कमी करायचे नाही, हा निर्णय घेण्यात आलाय. प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी ही बैठक आहे. धनगर समाजाप्रमाणे ओबीसींचही उपोषण संपेल, असा विश्वास बावनकुळे यांनी ठामपणे व्यक्त केला.

पटोलेंना भाजप कळलीच नाही

काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली. पटोलेंना भाजप कधी कळलीच नाही. म्हणुन ते काँग्रेसमध्ये गेले. भाजप व्यक्तीसाठी काम करीत नाही. राष्ट्रासाठी काम करतो. अमृत काळातील बलशाली भारतासाठी भाजप काम करीत आहे. भाजपमधील संघटन मजबूत आहे. पाय ओढण्याचे काम काँग्रेसमध्ये चालते, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला.

Edited by : Amol Jaybhaye

Pankaja Munde News
Ajit Pawar Fund News: आमदार नवघरेंची शरद पवारांना साथ, तरी अजित पवारांनी दिला भरघोस निधी..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com