Subodh Savji News: निवडणूक आयुक्तांचा मर्डर करेल, म्हणणारे माजी मंत्री अडचणीत; पोलिसांनी उचललं मोठं पाऊल

Election Commissioner: सावजी हे नुसती धमकी देऊन थांबले नाही तर त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना धमकीचे पत्र पाठवले होते. या पत्रामुळे पोलिस, प्रशासन यंत्रणेला जाग आली आहे.
Subodh Savji News
Subodh Savji NewsSarkarnama
Published on
Updated on

Election Commissioner News, 24 May: सावजी हे नुसती धमकी देऊन थांबले नाही तर त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना धमकीचे पत्र पाठवले होते. या पत्रामुळे पोलिस, प्रशासन यंत्रणेला जाग आली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाला खुनाची धमकी देणं, मात्री मंत्र्यांच्या अंगलट आले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात पाच टप्य्यातील मतदान झाले आहे. निवडणुकीच्या धामधुमीत माजी मंत्री सुबोध सावजी (Subodh Savji) थेट निवडणूक आयोगाला धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी दिलेल्या धमकीची दखल घेत पोलिसांनी त्यांच्यावर ही कारवाई केली आहे.

Subodh Savji News
Udayanraje Bhosale News: उदयनराजेंनी घेतला समन्वयकांकडून अंदाज, विजयाची गणिते कशी जुळणार?

"जर निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केला तर मी त्यांचा खून करेल, मर्डर करेल," अशी धमकी सावजी यांनी दिली होती. सावजी हे नुसती धमकी देऊन थांबले नाही तर त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना (Election Commissioner) धमकीचे पत्र पाठवले होते. या पत्रामुळे पोलिस, प्रशासन यंत्रणेला जाग आली आहे. पोलिसांनी सुबोध सावजी यांच्यावर डोणगाव येथील पोलिस स्टेशन मध्ये कलम 506 अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

आपल्या हटके आंदोलनांमुळे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी अधिकाऱ्यांना दिलेल्या धमक्यांसाठी सुबोध सावजी प्रसिद्ध आहेत. यापूर्वी त्यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी, जिल्हा परिषदेतील अधिकारी यांच्या मर्डरची धमकी दिली होती. आता त्यांनी थेट निवडणूक आयक्तांनाच धमकी दिली आहे

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

“माझ्या डोळ्यादेखत महाराष्ट्रातील करोडो मतदारांच्या लोकशाही पद्धतीने वापरलेल्या मतदारांच्या अधिकाराचा आपण जर उघड-उघड खून करणार असाल, मुडदा पाडणार असाल, तर मी या मतदारांच्या हक्काच्या सन्मानार्थ आपला मुडदा पाडेल किंवा खून करण्यास मागे पुढे पाहणार नाही. आणि लोकशाहीच्या इतिहासात मी माझे नाव अजरामर करेन”, असे सावजी यांनी पत्रात नमूद केले आहे.

“महाराष्ट्रात असलेला मतदाराचा कौल हा महाविकास आघाडी या पक्षांकडेच आहे. या आधारे एकूण ४८ जागापैंकी ३८ ते ४० लोकसभेच्या जागा या महाविकास आघाडीच्या येणारचं, परंतु जनतेच्या आणि माझ्या मनात संशय आहे की, आपण ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करुन लोकांच्या मतदानाचा लोकशाहीचा गळा घोटणार आहात. असे घडल्यास महाराष्ट्रातील मतदारांच्या वतीने या अन्यायाच्या विरोधात मी आपला गळा घोटल्याशिवाय राहणार नाही”, असे त्यांनी पत्रात नमूद केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com