Sudhir Mungantiwar and Sanjay Rathod
Sudhir Mungantiwar and Sanjay RathodSarkarnama

Shinde Cabinet : मुनगंटिवार आणि राठोड दोन्ही माजी वनमंत्री पुन्हा मंत्रीमंडळात

विदर्भातून भाजपचे ज्येष्ठ नेते माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि पश्‍चिम विदर्भातून शिंदे गटात गेलेले माजी वनमंत्री आमदार संजय राठोड यांची वर्णी लागली आहे.

नागपूर : एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर आज झाला. यामध्ये प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विदर्भाचा विचार करता, पूर्व विदर्भातून भाजपचे ज्येष्ठ नेते माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि पश्‍चिम विदर्भातून शिंदे गटात गेलेले माजी वनमंत्री आमदार संजय राठोड यांची वर्णी लागली आहे. या दोघांनीही वनमंत्री म्हणून काम पाहिले होते.

शिंदे (Eknath Shinde) गटाकडून ९ आणि भाजपकडून ९ आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये राज्यपालांचे (Governor) आगमन झाल्यानंतर लगेच हा सोहळा सुरू झाला. मंत्रिमंडळात भाजपने (BJP) महाराष्ट्राचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस, माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे, (Chandrashekhar Bawankule) पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, हिंगण्याचे आमदार समीर मेघे, आमदार मोहन मते आणि शिंदे गटामध्ये गेलेले रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल आणि भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नावाची चर्चा होती. पण त्यांचा समावेश करण्यात आली नाही. या या लोकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मंत्र्यांचा संक्षिप्त परिचय..

आज शपथ घेतलेल्यांमध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे ज्येष्ठ आणि अनुभवी चेहरा असणार आहेत. सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे हेवीवेट नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे अतिशय निकटस्थ म्हणून ओळखले जातात. आमदारकीची ही त्यांची सहावी टर्म आहे. चंद्रकांत पाटील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून आमदार आहे. मागील सरकारमध्ये ते सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते. महसूल विभागाचाही कारभार त्यांनी सांभाळलेला आहे. विजयकुमार गावीत नंदुरबारचे आमदार आहेत. १९९५ मध्ये पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आले. युती सरकारमध्ये राज्यमंत्री होती. नंतर २०१४ पर्यंत ते राष्ट्रवादीचे आमदार होते. राजीनामा दिल्यानंतर भाजपमध्ये आले आणि आज त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

गिरीष महाजन हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटस्थ आहेत. भाजपचे संकटमोचक अशी त्यांची ओळख आहे. उत्तर महाराष्ट्रात १९९५ मध्ये त्यांनी पहिली निवडणूक लढवली. अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेतले. यात त्यांची महत्वाची भूमिका होती. गुलाबराव पाटील यांचे जळगावमध्ये मोठे वर्चस्व आहे. यापूर्वी ते पाणीपुरवठा मंत्री होते. २०१९ मध्ये मंत्री झाले. महाविकास आघाडीचे जळगावचे पालकमंत्री होते. त्यांनी मोठा संघर्ष केला आहे. एक छोटीशी पानटपरी चालवत होते. तेथून त्यांनी येथवर मजल मारली आहे. दादा भुसे शिवसेनेच्या तिकिटावर मालेगाव बाह्य मतदार संघातून निवडून आले होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये ते कृषिमंत्री होते. सहकार महर्षी भाऊसाहेब हिरे यांचे मोठे वर्चस्व होते. त्याला सुरुंग लावण्याच काम दादाजी भुसे यांनी केले. ते सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत. सेना भाजप युती सरकारमध्येही ते मंत्री होते. उद्धव ठाकरे सरकारमध्येही त्यांनी कृषिमंत्री म्हणून काम केले.

संजय राठोड बंजारा समाजाचे नेतृत्व करतात. महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. पण आरोप झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. बंजारा समाजाचे महंतदेखील उद्धव ठाकरेंना भेटले होते. तेव्हा ते मंत्री झाले नाही, पण आता शिंदे गटात आल्यानंतर त्यांना संधी मिळाली. शिंदे गटाचा कट्टर चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. सुरेश खाडे सांगलीच्या मिरज विधानसभेचे नेतृत्व करतात. तीन टर्मचे आमदार आहेत. मागच्या सरकारमध्ये सामाजिक न्याय मंत्री होते. आज भाजपने पुन्हा त्यांना संधी दिली आहे. संदीपन भुमरे पैठण संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये स्लीप बॉय म्हणून म्हणून काम केले. १९९५ पासून ते आजपर्यंत ते पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. मराठवाड्यातला शिवसेनेचा महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांच्याकडे मोठी जबाबदारी येऊ शकते.

Sudhir Mungantiwar and Sanjay Rathod
आमदार मुनगंटीवार म्हणाले, देव करो अन् त्यांना पुढचे चिन्ह खंजीरच मिळो…

उदय सामंत यांची २०१८ साली म्हाडाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. २० वर्षांपासून राजकीय सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात भरीव काम त्यांनी केले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री होते. शिंदे गटामध्ये जाणारे ते शेवटचे आमदार होते. ४०वा आमदार म्हणून ते गुवाहाटीमध्ये पोहोचले होते. तानाजी सावंत

२०१८ मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत आले होते. उस्मानाबादमधील परंडा भूम येथून आमदार झाले. भाजप आणि युती सरकारच्या काळात विधान परिषदेवर निवडून आले होते. शिक्षण सम्राट आणि साखर सम्राट म्हणूनही त्यांची ओळख आहे. शिंदे गटात गेल्यानंतर त्यांच्या कार्यालयावर हल्ला झाला होता. महाविकास आघाडीवरील टीकांना त्यांनी खतपाणी घातलं होतं.

रवींद्र चव्हाण २०१५ मध्ये भाजयुमोचे अध्यक्ष होते. डोंबीवली मध्ये नगरसेवक होते. २०१४ मध्ये वैद्यकीय राज्यमंत्री होते. २००९ पासून सलग तीन वेळा आमदार आहेत. पहिल्या दिवसांपासून एकनाथ शिंदेंसोबत आमदार चव्हाण होते. अब्दुल सत्तार मविआ सरकारमध्ये ग्रामविकास खात्याचे मंत्री होते. २००९ मध्ये विधान परिषदेचे आमदार होते. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोडचे आमदार आहेत. १९८४ साली ग्रामपंचायतीची निवडणूक लढवून निवडून आले होते. २०१९ मध्ये कॉंग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. दीपक केसरकर १९९५ मध्ये नंदुरबार मधून अपक्ष निवडून आले होते. २०१४च्या शिवसेनेकडून आमदार होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री होते. सावंतवाडीमधून निवडून आले होते. शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते आहेत. केसरकर राष्ट्रवादीमधून शिवसेनेत आले होते

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com