Sudhir Mungantiwar News : वाघाला हरवण्यासाठी सर्व प्राणी एकत्र आले, पण वाघाने डरकाळी फोडली की...

Rahul Gandhi : सर्वांचं एकमत झालं तर राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama
Published on
Updated on

Mungantiwar attacked the unification of the opposition : एकीकडे नरेंद्र मोदी आहेत आणि दुसरीकडे कोण पंतप्रधान होणार, हे आधी त्यांनी ठरवलं पाहिजे. पाटण्याच्या बैठकीत सहभागी झालेले शरद पवार, अरविंद केजरीवाल, नितीश कुमार, केसीआर, सोनिया गांधी यांच्यापैकी कुणी एक किंवा त्यांचं सर्वांचं एकमत झालं तर राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, असं काहीतरी त्यांनी जाहीर केलं पाहिजे, असा खोचक टोला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांना लगावला. (What Modi did in Gujarat before becoming Prime Minister)

आज चंद्रपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना मंत्री मुनगंटीवार म्हणाले, एकदा त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरला की, मग जनतेलाही चॉईस असेल. पंतप्रधान होण्याआधी मोदींनी गुजरातमध्ये जी कामं केली, त्याची तुलना करता आली. एकीकडे मनमोहन सिंह देशाचे नेतृत्व करत होते आणि दुसरीकडे मोदींनी गुजरातचे चित्र बदलले होते. तसं या मंडळींनी त्यांच्या त्यांच्या राज्यात काय काम केले, हे सांगितले पाहिजे.

वाघाला पराभूत करण्यासाठी जंगलातले सर्व प्राणी एकत्र आले आणि वाघाने डरकाळी फोडली, सर्व प्राणी पळून जातात. यांचे तसे होऊ नये. पाटण्याच्या बैठकीत सर्व अयशस्वी नेते एकत्र आले होते. पुन्हा कुठेतरी ते एकत्र येणार आहेत म्हणे. पण त्यांच्या एकत्र येण्याने मोदी सरकारला (Modi Government) कुठलाही फरक पडणार नाही. त्यांना देशाच्या प्रगतीची चिंता नाही, तर त्यांच्या मुलाबाळांची चिंता आहे, असा खोचक टोला मुनगंटीवारांनी विरोधकांच्या एकत्रीकरणावर लगावला.

Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar News : एबी फॉर्मवर प्रदेशाध्यक्षाची सही असते, विरोधी पक्षनेत्याची नाही; मुनगंटीवारांनी अजित पवारांना डिवचले !

१० मुख्यमंत्री तयार..

आज राज्यात १० मुख्यमंत्री (Chief Minister) तयार आहेत. मनापासून राज्याची सेवा करण्यासाठी सर्वच्या सर्व भावी मुख्यमंत्री तयार आहेत. दररोज कुठे ना कुठे ‘भावी मुख्यमंत्री’चे बॅनर लागतात. या देशात कुणीही मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न बघू शकतो. पण ते ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ ठरू नये, येवढंच त्यांना सांगणे आहे, असेही सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com