Sudhir Mungantiwar News : छत्रपतींच्या महाराष्ट्रात औरंगजेबाचे फोटो झळकवाल, तर आम्ही काय फक्त निवेदने देऊ का?
Sudhir Mungantiwar gave a solemn warning : विदर्भातील अकोल्यात दंगल झाली, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि काल (ता. ७) कोल्हापूरमध्ये दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. इतक्या औरंग्याच्या औलादी आल्या कुठून’, असा संतप्त सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केला होता. त्यानंतर आता या विषयावर वनमंत्री मुनगंटीवारही आक्रमक झाले आहेत. (After that, the atmosphere in the state has been stirred)
मध्यप्रदेशमधील इंदौर येथे आज (ता. ८) मोदी @9 साठी आयोजित पत्रकार परिषदेत सुधीर मुनगंटीवार यांनी असामाजिक तत्त्वांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. ते म्हणाले, सद्यःस्थितीत औरंगजेबाच्या दृष्ट बुद्धीचे उदात्तीकरणे सत्तेसाठी केले जात आहे. तेच राजकीय पक्ष दंगलीसाठी जबाबदार आहेत. तुम्ही औरंगजेबाचे फोटो झळकवाल, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आम्ही काय केवळ निवेदन देऊन गप्प बसू का, असा सवाल त्यांनी केला.
भाजप मुस्लिमांच्या विरोधात असल्याचा अपप्रचार केला जात आहे. यामागेही काही असामाजिक तत्त्वांचा हात आहे. पण भाजपचा मुस्लिमांना विरोध नाही. कारण तसं असतं तर एपीजे अब्दुल कलाम यांना भाजपने राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचवलं नसतं. भाजपने ते केलं, कारण कलाम राष्ट्रप्रेमी होते. पण औरंगजेब अत्याचारी होता. त्यामुळे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असे मंत्री मुनगंटीवार म्हणाले.
औरंगजेब मुस्लीम आहे. हा भाव कुणीही मनात आणू नये. तो मुस्लीम होता की कुण्या अन्य धर्माचा, हा प्रश्नच नाही. औरंगजेब अत्याचारी होता. त्याने बापाला जेलमध्ये टाकले, भावाला मारले, हिंदूच नाही, तर मुस्लीम बहीणींवरही अत्याचार करण्याची परवानगी त्याने दिली होती. संभाजी महाराजांना ४० दिवस यातना देऊन त्यांचा अनन्वित छळ केला. गरम सळाखींनी त्यांचे डोळे फोडले, चामडी सोलली. अशा औरंगजेबाचे उदात्तीकरण महाराष्ट्रातच नव्हे तर कुठेही चालणार नाही, असा सणसणीत इशारा सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.
कॉंग्रेसच्या काळातही काही कामे झाली..
कॉंग्रेसच्या (Congress) काळातही कामे झाली, काहीच झाले नाही, असं नाही. पण गती नव्हती, कॉंग्रेसची गती खुर्चीच्या भोवताल फिरत होती, असा प्रहार मुनगंटीवारांनी (Sudhir Mungantiwar) केला. गुजरात हे भगवान कृष्ण, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांचे गुजरात म्हणून ओळखले जाते. पंतप्रधान मोदी त्यांच्याच विचारांनी देशाला पुढे नेत आहेत.
लाल बहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान जय किसान’चा नारा दिला. अटल बिहारी वाजपेयी यांनी ‘जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान’, असा नारा दिला. तर आता मोदींनी (Narendra Modi) ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान’, असा नारा देऊन देशाच्या प्रगतीचा वेग वाढवला असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.