Sunil Kedar's initiative : वेकोलि चेक पोस्टवर ठेवले मृतदेह, अखेर आमदार केदारांच्या पुढाकाराने निघाला तोडगा !

WCL administration : नुकसान भरपाईचे आश्वासन वेकोलि प्रशासनाने दिले.
Sunil Kedar and Others
Sunil Kedar and OthersSarkarnama

Nagpur WCL Explosion News : वेकोलिच्या कामठी खुल्या कोळसा खाणीत केलेल्या स्फोटाच्या हादऱ्याने सोमवारी (ता.२८) हरिहर नगरातील ३५ वर्षीय युवक आणि त्याच्या सहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी काल (ता. २९) वेकोलि चेक पोस्टवर दोघांचे मृतदेह ठेवत चार तास आंदोलन केले. (They protested for four hours keeping the dead bodies at WCL check post)

अखेर माजी मंत्री, सावनेरचे आमदार सुनील केदार यांच्या पुढाकाराने मृताच्या पत्नीला वेकोलित कंत्राटी नोकरी आणि नुकसान भरपाईचे आश्वासन वेकोली प्रशासनाने दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

उपक्षेत्र कार्यालयात मृतांचे नातेवाईक, स्थानिक पुढारी आणि नाभिक एकता मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी उपक्षेत्रिय प्रबंधक दीक्षित यांच्याशी चर्चा केली. त्यांनी मागण्या मान्य न केल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी वेकोलि चेक पोस्टवर दोन्ही मृतदेहांसह आंदोलन करीत वाहतूक ठप्प केली.

आमदार सुनील केदार यांचा पुढाकार..

आमदार सुनील केदार यांनी पुढाकार घेत वेकोलिच्या ‘सीएमडी’सोबत चर्चा केली. मृतक कमलेश गजानन कोठेकरच्या पत्नीला कंत्राटी नोकरी देण्याचे आणि तत्काळ नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिल्यानंतर उशिरा रात्री दोन्ही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतकाच्या पत्नीला खाणीत कंत्राटी नोकरी व समितीव्दारे सर्व्हे करून तत्काळ नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिल्याने दोन्ही मृतदेहांवर उशिरा रात्री अंतिम संस्कार करण्यात आले.

यश चॉकलेट आणण्यास गेला अन् घर कोसळले..

घटनेच्या दिवशी कमलेशची पत्नी उषा मजुरीला गेली होती. आई यमुनाबाई शेजारी बसायला गेली होती. तर मुलगा यश चॉकलेट आणण्यासाठी दुकानात गेला होता. त्यामुळे हे दोघे आजी-नातू बचावले. कमलेशच्या मृत्यूने कोठेकर कुटुंबावर संकट कोसळले आहे.

Sunil Kedar and Others
Sunil Kedar News : फडणविसांच्या आढावा बैठकांना आमदार केदारांनी ‘अशी’ दिली टक्कर !

या आंदोलनात आमदार सुनील केदार, (Sunil Kedar) कॉंग्रेसचे (Congress) नागपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, उपाध्यक्ष नरेश बर्वे, माजी आमदार डी.एम. रेडडी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष (ZP) रश्मी बर्वे, पंचायत समिती सभापती मंगला निबोंने, उपसभापती करुणा भोवते, बळवंत पडोळे, श्याम बर्वे, सीताराम भारद्वाज, सुखलाल मडावी, चंद्रशेखर बावनकुळे, बैसाखु जनबंधु, महेश झोडावणे, गणेश सरोदे, राहुल टेकाम, नाभिक एकता मंचाचे शरद वाटकर, नरेश लक्षने, संतोष दहिफळकर, सुनील लक्षने, आकाश पंडीतकर, रोशन बोरकर, किशोर गाडगे, छ्त्रपती येस्कर, दत्तू खडसे, सुहास पुंडे, दिलीप गाडगे, प्रफुल्ल लक्षणे, संदीप माहुलकर, प्रभाकर कावळे, राजेंद्र घोटेकर, भगवान कावळे आदी सहभागी झाले होते.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com