Gandhi Thoughts : खासदार सुनील मेंढेनी धरली महात्मा गांधींच्या विचारांची कास !

Sunil Mendhe : यंत्रणा तालुकास्तरावर राबविण्यासाठी बांधला चंग.
Sunil Mendhe
Sunil MendheSarkarnama
Published on
Updated on

Bhandara Politics : गावाकडे चला हा नारा महात्मा गांधी यांनी दिला. महात्मा गांधी यांच्या विचाराला धरून खासदार सुनील मेंढे यांनी यंत्रणा तालुकास्तरावर राबविण्याची कास धरली आहे. कामगारांचे हित लक्षात घेत महाराष्ट्र शासनाकडून गृह उपयोगी वस्तू आणि संरक्षण किटचे वाटप केले जात आहे.

एकाच ठिकाणी जिल्हाभरातील कामगारांचे या योजनेसाठी एकत्रीकरण होत असल्याने प्रथम प्रचंड अव्यवस्था आणि गैरव्यवहार दिसून आला. त्यामुळे नाहक शासनाच्या चांगल्या हेतूला गालबोट लागत आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता हे वाटप प्रत्येक तालुकास्तरावर करण्यात यावे, अशी सूचना भाजप खासदार सुनील मेंढे यांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सचिवांना पत्राद्वारे केली आहे.

Sunil Mendhe
Gondia OBC News : ओबीसीच्या जनगणनेसाठी जिल्ह्यात पोहोचली यात्रा !

सध्या भंडारा जिल्ह्यात कामगारांना दिल्या जात असलेल्या गृह उपयोगी वस्तू आणि संरक्षण किटचा विषय चर्चेत आहे. कामगारांना मदत आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे होता व्हावे म्हणून शासनाचा हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. मात्र हे करताना अंमलबजावणी करणारी यंत्रणा आणि तेथील गोंधळामुळे चांगल्या हेतूला गालबोट लागण्याची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यातील सर्वच कामगार एकाच ठिकाणी साहित्य घेण्यासाठी एकत्रित असल्याने प्रचंड गर्दी, बेला येथील सचिन मंगल कार्यालय परिसरात होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गर्दीचा फायदा घेत तिथे आलेल्या महिलांसोबत गैरप्रकार झाल्याचे ऐकण्यात आले आहे. गर्दीमुळे काही महिलांना भोवळही आल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे शासनाची बदनामी होत आहे. चांगल्या उद्देशाने हाती घेतलेला हा उपक्रम खऱ्या अर्थाने गरजूंपर्यंत पोहोचावा आणि तो देताना शासनाची बदनामी होऊ नये, यासाठी केले जात असलेले साहित्य वाटप तालुकास्तरावरून करण्यात यावे. प्रत्येक तालुक्यात साहित्य वाटपासाठी यंत्रणा उभारण्यात यावी, अशी सूचना खासदार सुनील मेंढे यांनी केली आहे.

कामगार किट हा मुद्दा सध्या कामगारांच्या जिव्हाळ्याचा झाला आहे. सरकारने सद्धा निवडणुकीचा मुद्दा लक्षात ठेवून लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कामगार किट वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. जिल्ह्याच्या ठिकाणीच हा कार्यक्रम होत असल्यामुळे सातही तालुक्यातील कामगार एकाच ठिकाणी एकत्र येत आहेत. त्यामुळे चांगलीच गर्दी कामगार कार्यालयात बघायला मिळत आहे. कामगारांचा लोंढाच रस्त्यावर पहायला मिळत आहे. गर्दीचा समाजकंटक गैरफायदा घेऊ शकतात ही बाब ओळखत खासदार सुनील मेंढे यांनी सचिवांना पत्र लिहून एक प्रकारे त्यांना अवगत केल्याचे जिल्ह्यात बोलले जात आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com